वाल्हे, ता. २२ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) व इयत्ता आठवी (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (ता. २२) नीरा (ता. पुरंदर) येथील केंद्रावर शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. इयत्ता पाचवीसाठी येथील महात्मा गांधी विद्यालय व किलाचंद कनिष्ठ महाविद्यालय, तर इयत्ता आठवीची परीक्षा सौ. लीलावती रिखवलाल शहा कन्या विद्यामंदिरात पार पडली.महात्मा गांधी विद्यालय केंद्रावर नीरासह पिंपरे खुर्द व गुळुंचे परिसरातील १८१ विद्यार्थी परीक्षेस बसल्याची माहिती केंद्रसंचालक अनिल धुमाळ यांनी दिली. सौ. लीलावती रिखवलाल शहा कन्या विद्यामंदिर केंद्रावर नीरासह वाल्हे, पिंगोरी, गुळूंचे, जेजुरी, पिंपरे, व मांडकी येथील एकूण १८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचे केंद्रसंचालक निर्मला माने यांनी सांगितले. भरारी पथकातील चिंतामण अद्वैत यांनी केंद्रांना भेट देऊन पाहणी केली व परीक्षा प्रक्रियेची माहिती घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.