पुणे

मेंढपाळाच्या मुलाची ज्युनिअर असोसिएटपदाला गवसणी

CD

वाल्हे, ता. १ : ‘संघर्ष आणि यशाची कथा’ अशी ओळख मिळवलेला अर्जुन बिरा महानवर याची भारतीय स्टेट बँकेत (SBI) ज्युनिअर असोसिएट (JA) पदावर निवड झाली आहे. कर्नलवाडीजवळील (ता. पुरंदर) झिरिपवस्तीतील एक साधे मेंढपाळ कुटुंबातील अर्जुनने अनेक अडचणींवर मात करीत अभिमानास्पद टप्पा गाठला आहे.
अर्जुनचे आई-वडील मेंढ्या राखून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शालेय जीवनातच अर्जुनने घराच्या कामांसोबतच शिक्षणाला प्राधान्य दिले. साध्या, ग्रामीण जीवनात वाढलेला अर्जुन दररोज एक नवा संघर्ष करत आपल्या ध्येयाकडे धडकत गेला. परिस्थितीचा थोडा सुद्धा तडजोड न करता त्याने शिक्षण, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर यश संपादन केले.अर्जुनने प्राथमिक शिक्षण झिरिपवस्तीच्या पुणे जिल्हा परिषद शाळेत घेतले, तर माध्यमिक शिक्षण गुळूंचे येथील ज्योतिर्लिंग हायस्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर वाल्हे येथील महर्षी वाल्मीक महाविद्यालयात वाणिज्य विभागातून अकरावी-बारावीचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षण सासवडच्या वाघिरे महाविद्यालयात झाल्यानंतर अर्जुन पुण्यात बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा देत होता. अर्जुनच्या यशामागे त्याची कष्टाची गोड गोष्ट आहे. त्याने अडीच वर्षे सतत तयारी केली आणि या कठीण प्रवासात त्याने आपल्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणींवर मात केली. अर्जुन यांची शुक्रवारी (ता. २७) भारतीय स्टेट बँकेत त्याची निवड ज्युनिअर असोसिएट पदावर जाहीर झाली. या यशाने अर्जुन आणि त्याच्या कुटुंबाने आनंदोत्सव साजरा झाला.

अर्जुनच्या यशाबद्दल शनिवारी (ता.२८) नीरा (ता.पुरंदर) येथील शिवस्वराज्य ग्रामीण पतसंस्थेमध्ये पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते अर्जुनचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्राजक्ता दुर्गाडे, संदेश पवार, अतुल गायकवाड, राजलक्ष्मी निगडे, पंचायत समिती सदस्या स्मिता निगडे, मोनिका कांबळे, पृथ्वीराज निगडे, संस्थेचे संचालक भरत निगडे, बिरा महानवर, उत्तम धुमाळ, दिलीप थोपटे, लक्ष्मण
वाघापुरे, बबन भोसले, सुवर्णा खराडे आदि उपस्थित होते.

यशामागे माझ्या कुटुंबाचे कष्ट आणि माझ्या मेहनतीचा हात आहे. घरची परिस्थिती कितीही कठीण असली, तरी मी कधीही हार मानली नाही. बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणं सोपं नव्हतं पण चिकाटी आणि जिद्द यामुळे हे यश मिळवले. हे यश मी फक्त स्वतःसाठीच नाही, तर माझ्या कुटुंबासाठी आणि गावासाठी समर्पित करत आहे.
- अर्जुन महानवर, झिरीपवस्ती


06574

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

Solapur Police Raid Orchestra Bars : एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे; महिलांसह 91 संशयितांवर गुन्हे दाखल; 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT