पुणे

श्री जानाई देवीच्या पालखीचे वाल्ह्यात स्वागत

CD

वाल्हे, ता. १ : जेजुरीचे ग्रामदैवत श्री जानाई देवीच्या पालखी सोहळ्याचे रविवारी (ता. १) वाल्हे (ता. पुरंदर) येथे आगमन झाले. पाटण तालुक्यातील निवकणे येथून परतीच्या प्रवासाला निघालेल्या श्री जानाई देवीच्या पालखी सोहळ्याचे ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने स्वागत केले.
मंगळवारी (ता. ३) सातारा जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात प्रवेश करताच श्री जानाई देवीच्या उत्सवमूर्तींना नीरा नदीवरील दत्तघाटावर शाही स्नान घालण्यात आले. यावेळी भाविकांनी दही-दुधाने महाभिषेक केला. यानंतर, ऊन-सावलीच्या खेळात भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा वाल्हेकडे मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्याचे भुजबळ कामठवाडी येथे आगमनानंतर ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीत हार-फुले देऊन श्री जानाई देवीच्या पालखीचे उत्साहात स्वागत केले. यावेळी संपूर्ण वातावरण भक्तिरसात रंगले होते.

भुजबळ कामठवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने श्री जानाई देवीच्या पालखीचे पूजन केले. यावेळी सोनबा भुजबळ, माजी सरपंच अमोल खवले, उद्योजक गोरख कदम, दादासाहेब मदने, तानाजी भुजबळ, आप्पा भुजबळ, संतोष गरूड, महेंद्र भुजबळ, रणजीत भुजबळ, सुनील शिंदे, पप्पू भोसले, किरण भुजबळ, आकाश जगताप, सचिन बनकर, अनिकेत भुजबळ आदी उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने जनाई भक्त नागूमाळी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष नागनाथ झगडे, प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे आदींचा सत्कार केला. अल्पशा विश्रांतीनंतर पालशी सोहळा जेजुरीकडे मार्गस्थ झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उमरासाठी जायचंय! दोनदा विमान रद्द झालं, पण आज जाणारच; तरुणाचा VIDEO व्हायरल

Yermala Crime : चोराखळी येथे कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News : तरूणपणी केला गुन्हा, म्हातारपणी झाली अटक; पोलिसांच्या जाळ्यात ३० वर्षांनतर असा अडकला फरार आरोपी

Nashik Municipal Budget : नाशिक मनपाचे ३०११ कोटींचे 'सिंहस्थ' बजेट सादर; करवाढ नाही, पण जाहिरात महागली!

Phulambri News : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT