पुणे

वाल्ह्यात विद्यार्थ्यांकडून रंगाची उधळण

CD

वाल्हे, ता. ७ : वाल्हे (ता. पुरंदर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शनिवारी (ता. ७) रंगपंचमी उत्सव साजरा करून आनंद आणि पर्यावरणाची काळजी यांचा सुंदर संगम दाखविला. शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चिमुकल्यांनी कोरडे व नैसर्गिक रंग वापरून रंगांचा उत्सव साजरा केला.
शनिवारी विविध रंगांची उधळण करीत चिमुकल्यांसह तरुण, तरुणी आणि महिलांनी रंगपंचमीचा आनंदोत्सव साजरा केला. बहुतांश ठिकाणी पिचकाऱ्यांतून रंगांची बरसात करीत चिमुकले चिंब झाले होते, तर कोरड्या व नैसर्गिक रंगांचा वापर करताना पाण्याचा अपव्यय होणारी नाही याची खबरदारी घेत वाल्हे शाळेतील बालगोपाळांनी अनोख्या, नावीन्यपूर्ण पद्धतीने रंगपंचमीचा रंगोत्सव साजरा केला. यावेळी चिमुकल्यांच्या निरागस चेहऱ्यावर अनेक रंग खुलल्याचे पहावयास मिळाले.
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक भारत वाघोले यांनी सांगितले की, ‘‘या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना रंगपंचमीचा आनंद देताना आरोग्य आणि पर्यावरण जपण्याचे महत्त्व पटविणे होता.’’
कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन सहशिक्षिका जयश्री पवार, अनिता वाघोले, कीर्ती लिपारे, नयना पवार यांनी केले. या उपक्रमात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

06623

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

Latest Marathi News Live Update : राज्यभरात उष्माघाताच्या 115 रुग्णांची नोंद

CBSE Parenting Calendar 2026-27: मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवा उपक्रम; सुजाण पालकत्वासाठी 'सीबीएसई'कडून पालकांसाठी मार्गदर्शक दिनदर्शिका जाहीर

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

SCROLL FOR NEXT