पुणे

प्रवीण जोशी यांना पीएच.डी. पदवी

CD

वाल्हे, ता. १० : गुळुंचे (ता. पुरंदर) येथील शिक्षक आणि ग्रामीण लेखक प्रवीण जोशी यांनी ‘प्रबोधन कालखंडाचा मराठी साहित्यावरील प्रभाव (१८०० ते १९५०)’ या विषयावर संशोधन पूर्ण करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.
जोशी सध्या पाडेगाव (ता. खंडाळा) येथील प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. त्यांनी १५० वर्षांतील भारतीय आणि पाश्चात्त्य प्रबोधनाचा मराठी साहित्यावरील परिणामांचा चिकित्सक अभ्यास केला. हजारो संदर्भग्रंथांचा आधार घेत त्यांनी हे मौलिक संशोधन पूर्ण केले. नोकरी सांभाळून पहाटेच्या वेळी त्यांनी हे संशोधन कार्य केले. त्यांना डॉ. वैजिनाथ राख यांचे मार्गदर्शन, तर डॉ. देविदास वायदंडे, डॉ. संदीप सांगळे, डॉ. सिद्धार्थ लांडे, डॉ. उमेश सिरसट आणि डॉ. कुंडलिक पारधी यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या या यशाबद्दल पुरंदर आणि खंडाळा तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
याबाबत बोलताना प्रवीण जोशी म्हणाले, ‘‘नोकरी, कुटुंब आणि संशोधन यांचा ताळमेळ साधत दीर्घकालीन संशोधन पूर्ण करण्याचा अनुभव अतिशय प्रेरणादायी राहिला. मी गावाच्या विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना ज्ञानाचे नवे मार्ग दाखवण्यासाठी, तसेच मराठी साहित्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार आहे.’’

06658

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: ५ कोटींच्या सोन्याची तस्करी, भाजप नेत्यासह ७ जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले; मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

Police Adhikshak Tushar Patil Death : अपर पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांचे निधन; वयाच्या ४५ व्या वर्षी प्राणज्योज मालवली

Abhijeet Dipke: भाजप-IT सेल भारतीय, बाकी पाकिस्तानी? हिंदू-मुस्लिम करून नोकऱ्या मिळत नाहीत; अभिजित दिपकेंची सरकारवर टीका

India-Nepal Dispute: सीमा वादावर नेपाळचा मवाळ सूर! भारताविरोधात संघर्ष नव्हे, संवाद हवा, परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

IND vs AFG Test, 2nd Day: भारताच्या साडेपाचशे धावा अन् अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत; पदार्पणवीर मानव सुतार चमकला

SCROLL FOR NEXT