पुणे

आदित्य सूर्यवंशी याची ‘पीएसआय’पदाला गवसणी

CD

वाल्हे, ता. ११ : नीरा (ता. पुरंदर) येथील आदित्य संतोष सूर्यवंशी याची पोलिस उपनिरीक्षकपदी (पीएसआय) निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी (ता. ९) सत्कार करण्यात आला. नीरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.
यावेळी माजी सभापती दत्ता चव्हाण अध्यक्षस्थानी होते. सर्जेराव पुजारी यांनी आदित्यच्या संघर्षाचे कौतुक करत तरुणांना गावाशी नाळ जपण्याचे आवाहन केले. दत्ता चव्हाण यांनी ग्रामीण भागातील तरुणांसाठी आदित्यचे यश प्रेरणादायी असल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना आदित्यने आपल्या यशाचे श्रेय आईचे कष्ट आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाला दिले. या वेळी त्याची आई स्वाती सूर्यवंशी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला अनिल चव्हाण, मनोज शहा, सचिन मोरे, अजित सोनवणे, विलास धोत्रे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रास्ताविक केले, जगदीश घुले यांनी सूत्रसंचालन केले, तर संग्राम पवार यांनी आभार मानले.

आईच्या कष्टांमुळे आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले आहे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर आपले ध्येय गाठावे.
- आदित्य सूर्यवंशी

06662

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik VS Suryakumar: २०२४ पासून सूर्यकुमार यादव-हार्दिक पंड्या यांच्यात मतभेद? खळबळजनक अहवालामुळे क्रिकेट विश्वात चर्चा

Thane Video: २६ वर्षांच्या सेवेचा सन्मान; वनाधिकाऱ्यांनी स्वतः वाहन चालवत चालकाला दिला निरोप

Latest Marathi News Update: भांगर बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य संशयित आणि माजी आमदार साओकत मोल्ला यांना एनआयए न्यायालयात हजर केले

Nursery Education: नर्सरीपासूनच इंग्रजीचे शिक्षण अनिवार्य, नवी मुंबई महापालिकेचा निर्णय; पण तज्ज्ञांची वेगळीच भूमिका

Mumbai: मुंबईतील रुग्णांसाठी खुशखबर! आता कमी दरात औषधं मिळणार; जेनेरिकसोबत ब्रँडेड औषधांवरही सवलत

SCROLL FOR NEXT