पुणे

कामठवाडीतील पाण्याच्या टाकीची दुरवस्था

CD

वाल्हे, ता. १० : वाल्हे (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीतील कामठवाडी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा टाकीची दुरवस्था झाली आहे. टाकीची गॅलरी तुटून लोंबकळत असल्याने परिसरातील नागरिकांसाठी धोका निर्माण झाला आहे.
ही पाण्याची टाकी अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आली असून, कालांतराने तिची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. टाकीच्या भिंतींना तडे गेले असून, खांबावरील काँक्रीट निघाल्याने आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. तसेच, टाकीच्या तळभागातून सतत पाणी झिरपत असल्याने पाण्याची गळतीही
मोठ्या प्रमाणात होत आहे. सततच्या गळतीमुळे टाकीचा पाया कमकुवत झाला आहे. या टाकीजवळून मुख्य
रस्ता जात असल्याने शाळकरी मुले, तसेच ग्रामस्थांची ये- जा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ही टाकी कधीही कोसळून अपघात होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पाणी गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून, गावातील पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे ही जुनी टाकी पाडून नव्या पाण्याच्या टाकीची उभारणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे अजित कोकरे यांच्यासह सोमवारी (ता. ९) या टाकीची पाहणी केली आहे. लवकरच नवीन टाकीबाबत जिल्हा परिषदेकडून आवश्यक तरतुदी केल्या जाणार आहेत.
- अतुल गायकवाड, सरपंच

06664

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?

DJ Noise Incident : लग्नाच्या वरातीतील डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा, १४० कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

Latest Marathi News Live Update : विधान परिषद निवडणुकीबाबत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांची बैठक

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT