पुणे

वाल्ह्यात स्वामी समर्थांच्या पालखीचे स्वागत

CD

वाल्हे, ता. १४ : ‘स्वामी समर्थ महाराज की जय..’च्या जयघोषात ओव्या गात, खांद्यावर भगव्या पताका घेऊन अक्कलकोट पालखी परिक्रमेसाठी निघालेल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे (ता. पुरंदर) येथे आतषबाजीत
जल्लोषात स्वागत करण्यात आले.
निरेवरून मार्गस्थ झालेल्या पालखी सोहळ्याचे शनिवारी (ता. १४) दुपारी अडीचच्या सुमारास आद्यरामायणकार महर्षि
वाल्मीकी ऋषींच्या वाल्हे नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आगमन झाले. यानंतर गावच्या वेशीवर ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली. पालखी सोहळा संत सावतामाळी मंदिरामध्ये अल्पशा विश्रांतीसाठी विसावल्यानंतर श्री स्वामी समर्थांची महाआरती झाली. तद्‍नंतर श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सचिन लंबाते, सागर भुजबळ, रणधीर खवले, संकेत शहा, सुरेश भुजबळ, प्रदिप चव्हाण, सचिन भुजबळ, राजकिशोर काबरा, भूषण भुजबळ, अतुल शहा, क्षितिज भुजबळ आदींसह महिला मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. पालखी सोहळा मंदिरामध्ये विसावल्यानंतर आरती झाल्यानंतर रांगा लावून भाविकांनी स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले. दरम्यान यावेळी पालखी सोहळ्याचे व्यवस्थापक संतोष भोसले, संजय कुलकर्णी आदींचा वाल्हे येथील श्री स्वामी समर्थ सेवा
मंडळाच्या वतीने सरपंच अतुल गायकवाड व माजी उपसरपंच सम्राज्ञी लंबाते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. विश्रांतीनंतर पालखी सोहळा खंडेरायाच्या जेजुरीकडे मार्गस्थ झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirdi Saibaba Darshan: विधानसभा निकालापूर्वी विजय थालापतीचे साईदर्शन; शिर्डीत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत संस्मरणीय भेट

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

Purandar Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी एकरी दीड कोटी रुपये मोबदला; सहा महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण करणार!

SCROLL FOR NEXT