वाल्हे, ता. २२ : आडाचीवाडी (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ज्ञानदेव भाऊसाहेब पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर येथील रहिवासी व रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच ज्ञानदेव पवार यांचा सत्कार करण्यात आला.
आडाचीवाडी ग्रामपंचायतीची दुसरी पंचवार्षिक निवडणूक असून, वाल्हे ग्रामपंचायतीपासून विभाजनानंतर स्वबळावर उभी राहिलेल्या या ग्रामस्थांच्या एकतेचे प्रतीक ठरली आहे. तत्कालीन उपसरपंच मोहन पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी शनिवारी (ता. २१) ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच सुवर्णा बजरंग पवार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारीत वेळेत उपसरपंचपदासाठी ज्ञानदेव पवार यांचाच एकमेव अर्ज आला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल हिरास्कर यांनी ज्ञानदेव पवार यांची उपसरपंचपदी
बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अलका पवार, शकुंतला पवार, विद्या पवार, लता पवार, प्रतिभा पवार आदी उपस्थित होते.
06778
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.