पुणे

वाल्हे पालखीतळावरील त्रुटी दूर करण्याच्या सूचना

CD

वाल्हे, ता. २५ : सुकलवाडी फाट्याशेजारी प्रांगणामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ता. १४ जुलैला विसावणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा मुक्कामाची पूर्वतयारी म्हणून वाल्हे येथील पालखीतळाची पाहणी करून माहिती घेऊन त्रुटींबाबत मार्गदर्शन केले.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान वाल्हे येथील पालखीतळावरील रेल्वे भुयारी मार्ग, भाविकांसाठी दर्शनबारी, दिंड्या व भाविकांना पालखीतळावर येण्याचा व बाहेर जाण्याचा मार्ग, रांगेतील दर्शन व्यवस्था, पालखी रथ येण्याचे मुख्य ठिकाण, बैठक व्यवस्था, नीरा स्नानादरम्यान जाणारा
पर्यायी मार्ग आदींची पहाणी करण्यात आली. यावेळी दिंडी समाज संघटना सचिव मारुती कोकाटे, जेजुरीचे पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, उपसरपंच सागर भुजबळ, तलाठी सागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालखीतळावर येणारा भुयारी मार्ग रुंदी विस्तारीकरण, रस्त्याच्या साइडपट्ट्या भरणे, भुयारीमार्गा बाहेरील पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील दुभाजके काढून सोहळ्यातील वाहनांसाठी बॅरिकेड्स लावून पर्यायी रस्ता करण्याबाबतची सूचना आळंदी देवस्थान प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी तहसीलदार विक्रम राजपूत व गटविकास अधिकारी डॉ. प्रणोती श्रीश्रीमाळ यांना केली. तर ग्रामसेवक अनिल हिरास्कर यांनी आभार मानले.

वाल्हे पालखी विसावा कट्टा एक नंबर
वाल्हे पालखीतळावरील कट्टा पाहून कमिटीने पालखी मुक्काम असलेल्या पालखीतळांमध्ये वाल्हे येथील पालखी तळावरील दगडी विसावा कट्टा एक नंबर असल्याचे गौरवोद्गार पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी काढले.

06805

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price Hike India : पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार? 48 तासांत 3 मोठे निर्णय, 'आरबीआय'नेही दिला इशारा, तुमच्या खिशावर होणार परिणाम!

प्रत्येक रंगाची एक किंमत आहे: हिंदी ZEE5 ने लॉन्च केला ‘सतरंगी- बदले का खेल’चा ट्रेलर

Video: सायलीच तन्वी असल्याचं उघड होणार ? नव्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्साह; "आता मालिका योग्य ट्रॅकवर"

Pune Hospital Bomb Scare : पुणे-हडपसर बॉम्बसदृश प्रकरण : संशयित आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात, 'आरोग्य विभागा'शी काय आहे कनेक्शन?

VD Satheesan Kerala CM : केरळला नवे नेतृत्व; काँग्रेसकडून व्ही. डी. सथीसन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

SCROLL FOR NEXT