पुणे

दौंडज परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ

CD

वाल्हे : दौंडज (ता. पुरंदर) परिसरात मंगळवारी (ता. २४) एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत अनेक पाळीव जनावरांना चावा घेतल्याची घटना घडली. या प्रकारामुळे पशुपालकांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अचानक घडलेल्या यामुळे परिसरात धास्ती पसरली आहे. हा कुत्रा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या मागे धावत होता. तसेच अनेक पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना चावा घेत होता.
चावा घेतलेल्या जखमी जनावरांवर तातडीने उपचार करण्यात आले असून वाल्हे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली. या घटनेमुळे दिवसभर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. विशेषतः लहान मुले, शेतकरी व पशुपालक यांच्यात भीती पसरली आहे. यापूर्वीही परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे.
दरम्यान या पिसाळलेल्या कुत्र्याने नेमक्या किती जनावरांना चावा घेतला, याची निश्चित माहिती उपलब्ध नसून ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांना जखमा झाल्या असतील त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन वाल्हे पशुवैद्यकीय दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माणिक बनगर यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे संबंधित विभागाने तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity : मुंबई-सुरत लोकल सेवा सुरू होणार? सुरत स्टेशनवर सुरू असलेल्या 'या' कामांमुळे चर्चेला उधाण.

NRAI Demands Immediate Restoration of Commercial LPG Supply : एमएनजीएल (MNGL) पाईपलाईन आता वेगाने धावणार? हॉटेल उद्योगासाठी मोठी बातमी.

SCROLL FOR NEXT