पुणे

नीरेत भरदिवसा शेळ्यांची पळवापळवी

CD

वाल्हे, ता. १ : नीरा (ता. पुरंदर) येथील दगडेवस्ती येथे भरदिवसा गोठ्यातून ८० हजार रुपयांच्या चार शेळ्या आणि दोन बोकड चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी राहुल चंद्रकांत वाघमोडे यांनी नीरा पोलिस दूरक्षेत्रात तक्रार दिली असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयास्पद स्विफ्ट मोटार दिसून आली आहे.
राहुल वाघमोडे चारा आणण्यासाठी घरी गेले असताना ही घटना घडली. चोरट्यांनी गोठ्यातील तीन गाभण शेळ्यांसह एकूण सहा जनावरे पळवून नेली. नीरा-मोरगाव मार्गावरील वर्दळीच्या ठिकाणी ही चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये एक कार संशयास्पदरीत्या फिरताना दिसली असून, पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार संतोष मदने करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत कलह उफाळला! शिंदे सेनेत बंडाची चाहूल; वाढत्या असंतोषामुळे नेते भाजपच्या वाटेवर?

Rain Alert: संभाजीनगरात अवकाळी वादळाचा तडाखा! पावसासह वादळी वाऱ्यांचा कहर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Marathi News Live Update : अकोल्यातल्या दहीहंडामध्ये कडाक्याच्या उष्णतेनंतर पावसाची हजेरी

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

SCROLL FOR NEXT