पुणे

सनई-चौघड्यांच्या सुरात भैरवनाथ-जोगेश्वरींचा शाही विवाह

CD

वाल्हे, ता. १० : पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ व देवी जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा मावळत्या सूर्याच्या साक्षीने आणि पारंपरिक थाटात उत्साहात पार पडला. सनई-चौघड्यांच्या मंगल स्वरात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा झाला.
कालाष्टमीनिमित्त पहाटे साडेचार वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदेश शिर्के यांच्या हस्ते महाअभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले. सकाळच्या सत्रात भावगीत व भक्तीगीतांचा कार्यक्रम झाला. अनेक भाविकांनी गूळ-पेढ्यांची शेरणी वाटून, तर काही भक्तांनी कावडींना नारळाचे तोरण बांधून दंडवत घालून नवस फेडले. उत्सवासाठी मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
सायंकाळी पालखी व कावडीच्या प्रदक्षिणेनंतर ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ''नाथ साहेबाचं चांगभलं''च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. सायंकाळी ६ वाजता देवाचे पोशाख व मंडवळ्या वाजत-गाजत मंदिरात आणल्या गेल्या. विधिवत पूजेनंतर उत्सवमूर्तींना नवीन पोशाख व बाशिंगे बांधण्यात आली. सायंकाळी ६.४५ वाजताच्या शुभमुहूर्तावर मंगलाष्टका होऊन अक्षदा व गुलालाच्या उधळणीत शाही विवाह सोहळा पार पडला. यावेळी भाविकांवर रंग, गुलाल-खोबऱ्याची उधळण करण्यात आली. या मंगल क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तर मंदिर परिसर हार-फुले, नारळ-गुलाल, खेळांच्या, पेढ्यांच्या दुकानांनी गजबजून गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri Chinchwad Education: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘बालभारती’ची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या दारी; पिंपरी-चिंचवडमध्ये मोफत वितरणाला सुरुवात

Sahyadri Tiger Reserve : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात रानकुत्र्यांचा सुळसुळाट; एकाच पायवाटेवर वाघ, रानडुक्कर आणि रानकुत्र्यांचे ठसे, काय आहे जंगलाचा नियम?

Mumbai Monsoon: मान्सून कोकणात, पण मुंबईत कधी? पुढील 4-5 दिवस कसं असेल हवामान? बाहेर पडण्याआधी चेक करा

प्लास्टिक सर्जरी चालू आहे का? पाच महिने झाले तरी झी मराठीच्या नायिकेच्या नाकावरची पट्टी हटेना; चाहते वैतागले

Latest Marathi News Update : कल्याण फाटा रोडवरील टायर गोदामाला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT