पुणे

नीरा येथे मूर्ती खरेदीला प्रतिसाद

CD

वाल्हे, ता. ३ : गणेशोत्सव अवघ्या अकरा दिवसांवर आल्याने नीरा (ता. पुरंदर) येथील बाजारपेठेत लगबग सुरू झाली आहे. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतींच्या प्रतिष्ठापनेसाठी नागरिकांची गर्दी वाढत असून, मूर्ती बुकिंगला प्रतिसाद मिळत आहे.
बाजारपेठेत ठिकठिकाणी आकर्षक गणेशमूर्तींचे स्टॉल सजले असून विविध आकार व कलाकुसरीच्या मूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मूर्तिकारांकडून सध्या मूर्तींवर रंगकामाचा अंतिम हात फिरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही मूर्तींचे रंगकाम पूर्ण झाले असून त्यावर जरीच्या लेस, मोती, खडे तसेच विविध सजावटीच्या साहित्याचा वापर करून आकर्षक स्वरूप देण्यात येत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार विविध भावमुद्रा, बैठकी तसेच आकर्षक आरास असलेल्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला होणारे श्रीगणेशाचे आगमन आणि अनंत चतुर्दशीपर्यंत चालणारा हा उत्सव साजरा करण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. ऐनवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी आगाऊ बुकिंगवर भर दिला जात आहे. बाजारात दगडूशेठ, लालबागचा राजा, पेशवाई, चौरंग अशा विविध बैठकीतील मूर्तींना मागणी असून, त्यांचे दर ३०० रुपयांपासून ७ ते ८ हजार रुपयांपर्यंत आहेत.
यंदा गणेशमूर्तींना मोठी मागणी असून, रंगकामासोबतच जरीच्या लेस आणि मोत्यांच्या मण्यांचा वापर करून मूर्ती सजवल्याचे युवा मूर्तिकार अमित मोहिते यांनी सांगितले. सार्वजनिक मंडळांच्या ऑर्डर वेळेत पूर्ण करण्यासाठी मूर्तिकार रात्रंदिवस काम करत असून, नीरा बाजारपेठेत आतापासूनच गणेशोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नागपुरात डीजे ‘सायलेंट’! ३ नोव्हेंबरपर्यंतचे आदेश; दहीहांडी, पोळा, गणेशोत्सव, नवरात्र आणि धम्मचक्रप्रवर्तन दिनीही राहणार बंद

Pune Traffic Update : पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल; ४-५ सप्टेंबरला ‘हे’ रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्गांची यादी पाहा

Vidyanand Bapat Assault : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणारा संतोष चव्हाण कोण? नेमकी कशामुळे केली मारहाण?

Marathi News Live Updates : नागपुरात डॉल्बी, प्लाझमा आणि मल्टीलेयर साऊंड सिस्टिमवर बंदी, आजपासून १ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू

Mumbai Viral Video : एका बाजूला अरबी समुद्र, दुसऱ्या बाजूला विमानतळ! मुंबईतील हे ८० कोटींचं घर पाहीलंत का? सोशल मीडियावर हवा...

SCROLL FOR NEXT