पुणे

उसात मेथीचे आंतरपीक घेतल्याने वाढले उत्पन्न

CD

यवत, ता.२३ : कासुर्डी (ता. दौंड) येथील गोपीनाथ भोंडवे यांनी आपल्या एक एकर उसाच्या शेतीमध्ये मेथीचे आंतरपीक घेतले आहे. सध्या मेथीला पुणे तसेच तालुक्यातून मोठी मागणी आहे. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले आहे. या प्रयोगामुळे ऊस तोडीपर्यंत चांगला फायदा होणार असल्याचा विश्‍वास भोंडवे यांना आहे.

उगवणीच्या काळात उन्हामुळे हे मेथीचे पीक करपण्याची शक्यता जास्त असते. यामुळे अनेकदा उत्पादन खर्चही भागत नाही. उसात आंतरपीक घेतले तर उसाच्या पानांची सावली या पिकाला उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षण देते. त्याचे करपण्याचे प्रमाण कामालीचे कमी होते. त्यामुळे उत्पादन वाढते आणि भावही चांगला मिळतो. याच सुत्राचा वापर करून भोंडवे यांनी खोडव्याच्या फुटीनंतर लगेचच मेथीचे आंतरपीक घेतले. सरी पद्धतीने लागवड केलेल्या उसाची तोडणी झाल्यावर त्यांनी पुन्हा खोडवा धरला. फुटी नंतर खोडव्याची बांधणी केली. खोडव्याच्या फुटीमुळे सावली झाल्याने मेथीची उगवण चांगली झाली. दरम्यान, उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने मेथीचे घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी असतो. परिणामी मेथीला चांगला भाव मिळण्याची याची भोंडवे कुटुंबीयांना खात्री आहे, गोपीनाथ भोंडवे यांचा मुलगा अक्षय याने ''सकाळ''शी बोलताना सांगितले.

मेथीचे पीक उन्हाळ्यात घेण्याचे अनेक शेतकरी टाळतात. पाणी देण्याची वेळ आणि उन्हाचा तडाखा यांचे गणित न जुळल्यास या पिकाला धोका असतो. उसात हे पीक घेतल्याने उन्हापासून पिकाचे चांगले संरक्षण होतो. या मेथीचे पीक भरघोस येते व चांगला फायदा होतो.
- गोपीनाथ भोंडवे. शेतकरी कासुर्डी (ता. दौंड)


00649

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यकुमारची विकेट घेणारा नाशिकचा रामकृष्ण घोष IPL 2026 स्पर्धेतून अचानक बाहेर; CSK ने केली मोठी घोषणा

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

SCROLL FOR NEXT