पुणे

यवतला संत तुकाराम महाराज पालखीची ग्रामप्रदक्षिणा

CD

यवत, ता. १६ : गुरुवारी यवत (ता. दौंड) येथे संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्कामी होता. आज सकाळी आठ वाजता पालखी वरवंड मुक्कामाला निघण्यापूर्वी पालखीची ग्राम प्रदक्षिणा झाली. ग्राम प्रदक्षिणेची ही अनेक वर्षांची परंपरा आहे. सकाळी आठ वाजता येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरातून या ग्राम प्रदक्षिणेला सुरूवात झाली.
यवत येथील ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन ग्राम प्रदक्षिणेला सुरूवात केली. मुख्य बाजारापेठेतून पुढे मारुती मंदिर, म्हसोबा चौक अशी प्रदक्षिणा मारत शाळेच्या प्रांगणात या प्रदक्षिणेचा समारोप झाला. शाळेच्या प्रांगणात सार्वजनिक आरती करण्यात आली. त्यानंतर महामार्गालगत असलेल्या सेवा मार्गावरील रथात ही पालखी ठेवण्यात आली.
दरम्यान यवत येथील मुक्कामात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिस बंदोबस्ताचे चोख नियोजन केले होते. मुक्कामाच्या काळात निर्मल वारीमुळे स्वच्छतेला मोठा हातभार लागला. स्टेशनरस्ता, बाजार मैदान, पोलिस ठाण्या शेजारील मोकळी जागा अशा विविध ठिकाणी अस्थायी शौचालये मोठ्या उभारल्याने वारकऱ्यांना सुविधा मिळाली. त्यामुळे मागील काही वर्षांपासून वारी मुळे होणाऱ्या अस्वच्छतेची समस्या कमी होण्यास मदत झाली.
ग्राम प्रदक्षिणेच्या मार्गात विद्या विकास मंदिराच्या विद्यार्थिनींनी रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. मार्गात स्थानिक नागरिकांनी, महिलांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी साडेआठच्या सुमारास यवत ग्रामस्थांचा निरोप घेऊन पालखी सोहळा सकाळी साडे आठच्या सुमारास वरवंड मुक्कामाच्या दिशेने प्रस्थान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

Indian Army Rocket System: आता शत्रूंची खैर नाही! पोखरणमध्ये पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी; भारताच्या संरक्षणशक्तीला नवी उंची

'या' तारखेवर जन्मलेल्या लोकांचा एकमेकांशी असतो 36 चा आकडा ! भेटल्यावर भांडण होणारच

Exam Paper Theft: धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्यानेच चोरली प्रश्नपत्रिका; सांगोला विद्यामंदिरात खळबळ..

SCROLL FOR NEXT