यवत, ता. ३ : दौंड तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा स्वर्गीय सुभाष बाबूराव कुल माध्यमिक विद्यालय वाटलुज (ता. दौंड) या ठिकाणी पार पडली. यावेळी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, माजी अध्यक्ष रामचंद्र नातू, महाराष्ट्र राज्य निवृत्त मुख्याध्यापक संघाचे सचिव आदिनाथ थोरात, टीडीएफचे राज्य अध्यक्ष जी. के. थोरात, बारामती तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सिकंदर शेख आदी उपस्थित होते.
याप्रसंगी दौंड तालुका मुख्याध्यापक संघाच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूकीसाठी शेख यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. सहविचार सभेचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड यांनी नवनिर्वाचित कार्यकारणीचे अभिनंदन केले. नातू यांनी प्रास्ताविक; तर व्ही. ए. वाघ यांनी सूत्रसंचालन केले. एस. एस. वाघमोडे यांनी आभार मानले.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष- अशोक भुजबळ (वाटलुज)
कार्याध्यक्ष- सुरेश वाघमोडे (नानवीज)
उपाध्यक्ष- सुरेश घाडगे (दौंड), मकरंद पवार (मोरेवस्ती), शिवाजी टूले (वाळकी)
सचिव- उत्तम जावळे (पिंपळगाव)
सहसचिव- अप्पासाहेब येडे (माळवाडी), महादेव कुदळे (देऊळगाव गाडा), अकलाक खान (दौंड)
विद्या समिती सचिव - संजय आढाव (गोपाळवाडी), भरत घेगडे (टाकळी भीमा) सुचिता शिंदे (केडगाव)
खजिनदार- प्रकाश जगदाळे (राहू)
सहखजिनदार- बाळासाहेब वागजकर (दौंड), राजू शिर्के (सोनवडी), संतोष दिवेकर (कडेठाण)
सदस्य- विठ्ठल खामकर (पाटस), दत्तात्रेय इवरे (रावणगाव), देवयानी तापकीर (बोरी पारधी), नंदकुमार पांडे (कोरेगाव भिवर)
प्रसिद्धीप्रमुख- हितेंद्र गद्रे (यवत).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.