पुणे

विठ्ठला, शेतकऱ्यांना समाधानी ठेव

CD

यवत, ता. ७ : ‘‘‍माझ्या आयुष्यात आषाढी व कार्तिकी एकादशी तसेच महाशिवरात्र हे तीन उपवास मनोभावे करीत आलो आहे. राज्यातील तमाम भाविकांचे दैवत असलेल्या विठ्ठलाच्या महापूजेची संधी मिळाली हा जीवनातील अलौकिक आनंद आहे. विठ्ठला, राज्यातील शेतकऱ्यांना सुखी समाधानी ठेव,’’ अशी प्रार्थना क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांनी विठ्ठलचरणी केली.

डाळिंब विठ्ठल बन (ता.दौंड) येथे कार्यक्रमात भरणे बोलत होते. दौंड, हवेली आणि पुरंदर या तीन तालुक्याच्या सीमेवर प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डाळिंब विठ्ठल बन येथील महापूजा राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे व सारिका भरणे यांच्या हस्ते करण्यात आली. विठ्ठलाच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी होती.
यावेळी बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले की, मे महिन्यातच सरासरी इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे विठ्ठलाला साकडे घालण्याऐवजी आभार मानले. डाळिंब गावच्या व देवस्थानच्या बाबतीत निधी कमी पडू देणार नाही. पुरंदर उपसा सिंचन खूपटेवाडीफाटा योजनेला २०० कोटी मंजूर करून योजनेचे काम सुरू केले आहे.

दरम्यान यावेळी माजी आमदार रमेश थोरात, देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, डाळिंब गावचे सरपंच बजरंग म्हस्के यांनीही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेत्रे, दौंड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दोरगे, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, किसन म्हस्के, मुरलीधर भोसेकर, संदीप ताम्हाणे, रामदास चौधरी, सागर म्हस्के, नंदू म्हस्के, अरुण म्हस्के, अनिल धिवार, दत्ता म्हस्के, उमेश म्हेत्रे, विठ्ठल बर्वे, प्रताप तावरे, संदीप गायकवाड, शासकीय अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. लक्ष्मण म्हस्के यांनी सूत्रसंचालन तर तान्हाजी म्हस्के यांनी आभार मानले.

01423

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: खुशखबर! दिवाळीपर्यंत आठव्या वेतन आयोगाची घोषणा? शिफारशी लवकरच लागू होणार

शांततेचा नोबेल पुरस्कार मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर, ट्रम्पना धक्का; कोण आहेत मारिया?

Viral Video : रोहित शर्मा उतरला शिवाजी पार्क मैदानावर! गौतम गंभीर, अजित आगरकरचं म्हणणं घेतलं मनावर; विराटही...

Yogi Adityanath: दिवाळीपूर्वी मुख्यमंत्र्यांचे मोठे गिफ्ट; १२० कुटुंबांना मिळाली हक्काच्या घराची चावी!

Minister Chandrakant Patil: विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार पॉकेटमनी: मंत्री चंद्रकांत पाटील; परदेशी विद्यापीठे महाराष्ट्रात पुढील काळात येणार

SCROLL FOR NEXT