पुणे

यवतच्या बाजारात वाढली जनावरांची आवक

CD

यवत, ता. २३ : दहा वर्षांच्या खंडानंतर नव्याने सुरू झालेल्या यवत (ता. दौंड) येथील जनावरांच्या बाजाराला शेतकरी व व्यापऱ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे या बाजारातून लाखोंची उलाढाल होत आहे.
यवत ग्रामपंचायतीचे सरपंच समीर दोरगे यांनी बैल बाजार पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीशी संवाद साधत दर शुक्रवारी जनावरांचा बाजार सुरू करण्यास मार्ग मोकळा केला. बाजारात दाखल होणाऱ्या जनावरांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.
पहिल्या आठवड्यात सुमारे ५० ते ६० गायी, म्हशींची व बैलांची आवक झाली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात अधिक नियोजन आणि तयारीमुळे जनावरांची आवक आणखी वाढली. गावातील तसेच परिसरातील अनेक शेतकरी आपल्या गरजेनुसार गाय, म्हैस व बैल खरेदी-विक्रीसाठी बाजारात दाखल झाले. व्यवहारांमध्ये उत्साह दिसत होता. तीसऱ्या आठवड्यात बाजारात येणाऱ्या जनावरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. यावेळी बाजारात येणाऱ्या जनावरांची संख्या तीनशेहून अधिक असल्याचे शेतकरी व व्यापाऱ्यांनी सांगितले.
एकेकाळी पुणे जिल्ह्यातील प्रमुख बाजारांत यवतचा जनारांचा सर्वात मोठा मानला जात होता. या जनावरांच्या बाजारामुळेच यवतची बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी देवाणघेवाण आणि खरेदी- विक्रीचे महत्त्वाचे केंद्र होते. येथील शेळी- मेंढी बाजार पूर्वीप्रमाणे सुरू होता. तरीही शेतकरी बांधव सातत्याने बैल बाजार पुन्हा सुरू करण्याची मागणी करत होते. दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत हा बैल बाजार भरतो. हा बाजार पुन्हा नव्याने सुरू होऊन पूर्वपदावर येत असल्याचे पाहून परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यवतचा बाजार बंद पडल्यापासून शेतकऱ्यांना काष्टी (ता. दौंड) व इतर दूरच्या बाजारपेठांमध्ये जावे लागत असे.

सुविधांमध्ये भर
बाजाराला नवे स्वरूप बैल बाजाराचे मैदान मुरूम टाकून सपाट केले आहे. जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्याचे काम सुरू आहे. गुरांचा बाजार सुरू झाल्यामुळे गावातील आठवडी बाजारातील उलाढालही वाढली असून, त्यामुळे स्थानिक व्यापारी, किरकोळ विक्रेते आणि सेवा पुरवठादारांना फायदा होत आहे, असे सरपंच समीर दोरगे यांनी सांगितले.

01522

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT