यवत, ता. ३ : यवत पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या सिंचित क्षेत्रातील शेतकरी पाणी वाटपाबाबत सध्या तक्रारींनी जोर धरला आहे. नवा मुठा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन १८ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. मात्र, पाटबंधारे विभागाच्या विनंतीवरून महावितरणने कालवा भागातील रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. पाणी मिळत नसल्याने यवत परिसरातील पिके जळू लागली आहेत. पाणी असूनही धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी अवस्था झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
इंदापूर तालुका कालव्याच्या शेवटच्या टोकाकडे असल्याने तेथील पाणी मागणी पूर्ण केल्याशिवाय हवेली व दौंडच्या शेतकऱ्यांनी पाणी वापरू नये यासाठी या भागातील रोहित्रांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. उन्हाळी आवर्तन सुरू झाले आहे. हे आवर्तन सुमारे ७० दिवस सुरू राहणार आहे. या कालावधीत सर्व शेतकऱ्यांना मागणी प्रमाणे पाणी देण्याचे आमचे नियोजन आहे, असा पाटबंधारे विभागाचा दावा आहे. मात्र, पाटबंधारेच्या कर्मचाऱ्यांच्या कृपेने काही शेतकऱ्यांना बेकायदेशीरपणे पाणी दिले जाते. असा शेतकरी वर्गाकडून आरोप होत आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधून पाणी वाटपाचे नियोजन व्हावे, अशी सर्वांची अपेक्षा आहे.
गेले बारा तेरा दिवस झाले कालव्याचे आवर्तन सुरू आहे. मात्र वीजपुरवठा खंडित केल्याने पिकांना गरज असून पाणी देता येईना. कायदेशीरपणे पाणी घेणाऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, नियमीत व कायदेशीरपणे पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र पाण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाने याकडे बारकाईने लक्ष घालणे गरजेचे आहे.
- तुषार (आण्णा) दोरगे, शेतकरी यवत (ता. दौंड)
यवत विभागातील सुमारे ४३ किलोमीटर लांबीच्या कालवा क्षेत्रात सुमारे ३०० वैयक्तिक पाणी उपसा योजना व तीन सहकारी पाणी उपसा योजना आहेत. या सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळेल, असे नियोजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. उन्हाळ्यात पाणी मागणी वाढलेली असते . त्यासाठी पाटबंधारे विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. आमचा कोणताही कर्मचारी यात बाधा आणत असल्याची तक्रार आल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
- सचिन पवार, सहाय्यत अभियंता (श्रेणी १), यवत पाटबंधारे विभाग
01537
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.