पुणे

लाटकर दाम्पत्याचे कांदा बियाणे निर्मितीचे व्रत

CD

यवत, ता. १२ : मागील ३०-३५ वर्षांपासून खात्रीचे कांद्याचे बियाणे निर्माण करण्याचे व्रतच यवत येथील लाटकर दाम्पत्याने अंगीकारले आहे. कांदा हे मुख्य पीक म्हणून घेणारे अनेक शेतकरी आहेत.
यवत येथील ज्ञानेश्वर (माऊली) व मंगल हे लाटकर दाम्पत्य मागील कांदा बियाण्याचे उत्पादन घेत आहेत. ‘ग्राहकांसाठी नित्य नियमाने, खात्रीचे कांदा बियाणे’ अशी लाटकर दाम्पत्याची ख्याती झालेली आहे. अर्धा एकर क्षेत्रात लाटकर दाम्पत्य चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतात.

बियाणे तयार होण्याच्या काळात त्याचे परागीभवन होण्यासाठी मधमाशा, फुलपाखरे यांचा वावर गरजेचा असतो. त्यासाठी माऊलींनी कृत्रिम मधमाशी पालनाच्या दोन-चार पेट्या या पिकाजवळ लावण्याचे नियोजन केले आहे. कांदा पिकाचे हळवी आणि गरवी दोन प्रकार आहेत. हळवी कांदा हा अल्पकाळात येत असला तरी तो टिकाऊ नसल्याने त्याची साठवणूक अवघड असते. हळवीच्या तुलनेत गरवी कांद्याला जास्त काळ लागतो. मात्र हा कांदा साठवणुकीसाठी योग्य असल्याने बागायती क्षेत्रासाठी त्यास पसंती असते. बाजारभावाचे गणित पाहून या कांद्याची विक्री करता येते. गरवी कांदा लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याने या कांद्याच्या बियाण्याला चांगली मागणी असते.

मजूर मिळणे अवघड झाले आहे. परिसरातील रोपवाटिका, वेगवेगळ्या कंपन्या येथे सावलीतील रोजगार उपलब्ध असल्याने शेतीकाम करण्याची मानसिकता कमी होत चालली आहे. स्वतःच्या शेतीत कष्ट करण्याचीही अलीकडील तरुणाईची मानसिकता राहिलेली नाही. त्यातच शेतमालाच्या बाजारभावाचा काही भरवसा राहिलेला नाही. त्यामुळे आमच्या नंतरची पिढी शेती करणार की नाही याची चिंता वाटते.
- ज्ञानेश्वर (माऊली) लाटकर, शेतकरी यवत (ता. दौंड)

01545

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT