पिंपळे गुरव, ता. १९ ः येथील काटेपुरम चौक येथे चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ‘होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत स्पर्धेचा आनंद लुटला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा प्रभू उपस्थित होत्या. अठरा वर्षांपासून ते सत्तर वर्ष वयापर्यंतच्या महिला स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. विजेत्यांना अश्विनी लक्ष्मण जगताप व अभिनेत्री गिरिजा प्रभू यांच्या हस्ते पैठणी तसेच फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशिन, मिक्सर, ओवन देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक शंकर जगताप, अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते प्रथम पाच सहभागी महिलांना आकर्षक पारितोषिके देऊन यावेळी गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक मानाची पैठणी काजल शेलार (विद्यानगर), द्वितीय सुप्रिया मुळे (मोरया पार्क), तृतीय मीनाक्षी पाटील (ज्ञानेश पार्क), चतुर्थ सुरभी हरपुडे (श्रीकृष्ण नगर), पाचवा जया म्हस्के (पूजा हॉस्पिटल) यांनी मिळविला. आर.जे. अक्षय घोळवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका उषा मुंढे, सुषमा कदम, रविना आंगोळकर, पल्लवी जगताप, वैशाली जवळकर, कावेरी जगताप यांनी केले. या प्रसंगी नगरसेवक शशिकांत कदम, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, नगरसेवक सागर आंगोळकर, राहुल जवळकर, संजय जगताप, शिवाजी कदम, आदित्य जगताप आदी कार्यकर्त्यांनी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
खेळ पैठणीचा या कार्यक्रमात सकाळ @९० प्रश्न मंजूषा स्पर्धा २०२२ प्रवेशिकाचे प्रमोशन सकाळ समूहाचे संजय पवार यांच्या माध्यमातून तसेच कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले मान्यवर अश्विनी लक्ष्मण जगताप, माजी नगरसेवक शंकर जगताप व सिने अभिनेत्री गिरिजा प्रभू यांच्या मार्फत करण्यात आले.
फोटो ः PMG22B00216
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.