पुणे

धुक्यामुळे पिकांना धोका आंबेगावाच्या पूर्व भागातील चित्र; ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त

CD

पारगाव, ता. ३ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात ढगाळ वातावरण तयार होत असून पहाटेच्या वेळी धुके पडत आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.
मागील महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून शेतकरी सावरू लागला होता. मागील आठवड्यापासून पडत असलेल्या थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले होते. गहू, हरबरा, कांदा आदी पिकांची वाढ जोमाने होऊ लागली होती. परंतु, गेल्या तीन चार दिवसांपासून परिसरात पहाटे धुके पडत असून दिवसभर ढगाळ वातावरण राहत आहे. यामुळे रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांदा पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. तसेच करपा, आकडी रोग, मावा आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोकाही वाढला आहे.

कोथिंबीर पिकांवर करपा, तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे फवारणी खर्चात वाढ होणार असून उत्पादनात घट होणार असल्याची माहिती वाळुंजनगर येथील कृषी पदवीधर जयेश वाळुंज यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price: महत्त्वाची बातमी! पेट्रोलचे दर वाढले; वाहनधारकांना मोठा फटका, नवे दर किती? जाणून घ्या...

Mayor: इटालियन फ्लोअरिंग, कौलारू छत, विशेष रूम अन्...; BMC च्या महापौर बंगल्याचा कायापालट होणार, कोणते बदल आणि खर्च किती?

'अगं अगं सुनबाई..' नंतर केदार आणि सना शिंदे यांचा नवा सिनेमा ‘आई भाड्याने हवी?’

Pune Fraud News : पाणी व्यवसायाच्या नावाखाली बाप-लेकांकडून दोन कोटी ३४ लाखांची फसवणूक; बाप-लेकांवर गुन्हा दाखल

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

SCROLL FOR NEXT