पुणे

कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पाणीपुरवठा थकबाकीपोटी दिवसभर बंद

CD

पुणे, ता. १५ : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि स्थानिक नागरिकांना दिलेल्या नळजोडांची थकबाकी जवळपास ७७ कोटी रुपयांवर पोचली आहे. वारंवार सूचना देऊनही बोर्ड ही थकबाकी देत नाही आणि कारवाईलाही विरोध होत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने बुधवारी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा संपूर्ण पाणीपुरवठाच बंद ठेवला. पुणे महापालिकेच्या वतीने पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला पाणीपुरवठा करण्यात येतो. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आस्थापनेकडे मागील अनेक वर्षांच्या पाणीबिलाचे ४८ कोटी रुपये थकीत आहेत. तर स्थानिक नागरिकांना पालिकेने काही वर्षांपूर्वी नळजोड दिले असून, त्याला मीटरही बसविण्यात आले आहेत. नागरिकांना दिलेल्या नळजोडांचेही २९ कोटी रुपये बिल थकले आहे.

थकबाकी वसुलीसाठी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां‍नी वेळोवेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्‍यांसोबत बैठका घेतल्या आहेत. तसेच वेळोवेळी नोटिसाही दिल्या आहेत. थकबाकीदार नागरिकांचे नळजोड तोडण्यासाठी पालिकेने कारवाईदेखील केली होती. थकबाकी भरावी यासाठी संबंधितांना लोक अदालतीमध्ये उपस्थित राहाण्यासाठी नोटिसाही पाठविण्यात आल्या होत्या. परंतु, यानंतरही बोर्डाने अद्याप थकबाकी भरलेली नाही. तसेच कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांकडून दमबाजी करण्यात येते. या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पाणीपुरवठा बुधवारी दिवसभर बंद ठेवला. तसेच उद्याही कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्‍यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : पुणे दहावी पेपरफुटी प्रकरण, पोलीस तपासात पेपर फुटला नसल्याचे समोर

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

SCROLL FOR NEXT