पुणे

विद्यार्थ्यांची कोरोना कवच विमा पॉलिसी काढा

CD

पुणे, ता. ३ ः राज्यातील शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची कोरोना कवच विमा पॉलिसी काढून देण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. या सामाजिक संस्थांना केवळ आपापल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध करून द्यावी. त्यांना आम्ही प्रायोजक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. जेणेकरून अवघ्या तीनशे रुपयांत विद्यार्थ्यांना कोरोनाकाळातील साडेसहा महिन्यांसाठी एक लाख रुपयांच्या विम्याचे कवच मिळू शकेल, असे सामाजिक कार्यकर्ते व श्रीनाथ स्वामी बहुउद्देशीय संस्थेचे श्यामकांत पाटील यांनी सोमवारी (ता. ३) सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी परत एकदा नव्याने शाळा सुरू होताना, कोरोना कवच विमा पॉलिसी नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. या पॉलिसीमुळे विद्यार्थी कोरोनाकाळात आत्मनिर्भर होऊ शकणार आहेत. त्यामुळे शाळांनी या पॉलिसीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्‍यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

कोरोना संसर्गामुळे मागील सुमारे १८ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्थितीवर परिणाम झाला आहे. राज्य सरकारने नुकतीच शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, इयत्ता आठवीच्या आतील विद्यार्थ्यांची स्थिती फारच भयाण आहे. सध्या राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटची बाधा झालेले कोरोना रुग्ण वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोरोना कवच पॉलिसीचा विद्यार्थ्यांना निश्‍चितच फायदा होऊ शकणार आहे. आमच्या सामाजिक संस्थेतर्फे पुणे शहरातील पूना स्कूल ॲँड होम फॉर ब्लाइंड ट्रस्ट या संस्थेतील ७ ते १७ या वयोगटातील १४० दिव्यांग विद्यार्थ्यांना या पॉलिसी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT