पुणे

सोन्याचे भाव ५१ हजार रूपये तोळा

CD

स्वारगेट, ता. २३ : रशिया-युक्रेन युद्ध, इंधनदरवाढ आणि कोरोनामुळे झालेले परिमाण यामुळे मार्च महिन्यात सोन्याचे दर प्रती तोळा ५४ हजारांच्या घरात गेले होते. मात्र, आता १५ दिवसांत सोन्याचे भाव जवळपास सहा टक्क्यांनी कमी होत ५१ हजार रुपयांच्या घरात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना पाडव्याच्या मुहूर्तावर सोने सध्यातरी कमी भावाने खरेदी करता येणार आहे. सोन्याचे भाव येणाऱ्या काळात वाढतच जाणार आहे, असे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

जानेवारी, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ५० हजारांच्या आसपास असलेला भावाने मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ५४ हजारापर्यंत मजल मारली होती. रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या परिणामाने हे भाव वाढले होते. मात्र आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांमध्ये आणखी काही जास्त पडझड होणार नाही, हा विश्वास आल्यामुळे हे भाव कमी झाले आहेत. त्याचबरोबर ग्राहकांची सोन्याची मागणीही कमी झाल्यामुळे भाव कमी झाले आहेत, अशी माहिती सराफ व्यावसायिक फत्तेचंद रांका यांनी दिली.

सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांची मागणी वाढून गुढीपाडव्याला सराफ व्यावसायिकांना चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे गेली दोन वर्ष नागरिकांना गुढीपाडव्याला सोन्याची खरेदी करता आली नव्हती. मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल केले आहेत. तसेच एकूण उद्योग व्यवसायाची स्थिती पूर्वपदावर आहे. त्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याला नागरिक सोन्याची खरेदी करतील व त्यातून या व्यवसायाची उलाढाल वाढले, असा विश्‍वास व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

सध्याचे दर ......
२४ कॅरेट - ५१,०००-५१,६००
२२ कॅरेट- 49500- 50,000

सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हीच सोने खरेदी करण्याची संधी आहे. पुढील काळात सोन्याचे भाव ५० हजारांच्या खाली येणार नाहीत.
- सौरभ गाडगीळ, पीएनजी ज्वेलर्स

सोन्याचे दर रशिया आणि युक्रेनच्या धर्तीवर वाढले होते. मात्र आत्ता दर स्थिर होत आहेत. गुढीपाडव्याच्या धर्तीवर ग्राहकांचा सोने खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळेल.
- वास्तुपाल रांका, रांका ज्वेलर्स

ग्राहकांची गेल्या काही दिवसांत सोन्याची
मागणी कमी झाल्यामुळेही सोन्याचे भाव कमी झाले आहेत. आगामी काळात सोन्याच्या भावात स्थिरता राहणार नाही. त्यामुळे ग्राहकांना या काळात सोने खरेदी करण्याची चांगली संधी आहे.
- अतुल अष्टेकर, अष्टेकर ज्वेलर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT