पुणे

स पटा

CD

03531
निळपण : येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांची भेट घेतली.

निळपणकरांनी घेतली
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजची भेट
कोनवडे : निळपण (ता. भुदरगड) येथील कुस्तीप्रेमी ग्रामस्थांनी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांची कोल्हापूर येथे भेट घेतली.
निळपण येथील ग्रामस्थांना कुस्तीची आवड असून यासाठी त्यांनी गावात हनुमान तालीम उभारली आहे. गावातील तरुणांचा ओढा कुस्तीकडे लागावा हा यामागचा उद्देश आहे. गावातील कुस्तीप्रेमींनी प्रोत्साहन देण्यासाठी ही भेट घेतली. कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ कोल्हापूर आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांचे कौतुक सोहळ्यासाठी निळपणचे कुस्तीशौकिन यांनी उपस्थिती लावली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज यांचा सत्कार करून निळपण गावातील नवोदित पैलवानांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्यासाठी जय हनुमान कुस्ती संकुल निळपण तालमीत भेट देण्यास आमंत्रित केले. या वेळी महेश पाटील, मनोज देसाई, सुहास ढेरे, पंचशील पाटील शहाजी रेडेकर.

00163
पैजारवाडी येथे २२ पासून भंडारा महोत्सव
देवाळे ः द्‌दगुरू चिले महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र पैजारवाडी (ता. पन्हाळा) येथे भंडारा महोत्सव सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवार (ता. २३) ते (ता. ३०) पर्यंत रोज पहाटे काकड आरती, ‘श्रीं‘ना अभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन, गुरूचरित्र पारायण व अखंड नामविणा आदी कार्यक्रम होणार आहेत. ३७ वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या चिले महाराज समाधी मंदिर संस्थान आयोजीत भंडारा महोत्सव निमित्त कोल्हापूर, पुणे, सांगलीसह परिसरातील मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. कोरोनामुळे बंद असणारे धार्मिक उत्सव कोरोना निर्बंध हटविले गेल्यामुळे भक्त परिवारात उत्साह आहे. बुधवार (ता. २७) रोजी रात्री विठ्ठलराव तात्यासाहेब वास्कर महाराज यांचे कीर्तन होईल. ता. २९ रोजी सकाळी महाप्रसाद व सायंकाळी पालखी ग्रामप्रदक्षिणा सोहळा होणार आहे. ता. ३० रोजी सकाळी एकनाथ नामदास महाराज, पंढरपूर यांचे गोपाळकाल्याचे कीर्तन होणार असून दुपारी महाप्रसाद व सायंकाळी ५ वाजता ध्वजवंदनाचा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण व विश्वस्त मंडळाने केले आहे.

02205
माजगाव ः खोतवाडीत ठेकेदारास जाब विचारताना ग्रामस्थ

खोतवाडी रस्त्याचे काम बंद पाडले
माजगाव : माजगाव फाटा ते खोतवाडी (ता. पन्हाळा) दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करून हे काम ग्रामस्थांनी बंद पाडले. माजगाव ते खोतवाडी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. तीन किलोमीटरच्या या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार पी. एन. पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुमारे ३६ लाख रुपये मंजूर झाले आहेत. कंत्राटदाराने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले होते. पण हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करून हे काम बंद पाडले. सार्वजनिक बांधकाम खात्याचे आनंद पाटील यांनी भेट देऊन कंत्राटदाराला विचारणा केली व सक्त सूचना दिल्या. दगडू गुरवळ, शिंदेवाडीच्या सरपंच सिंधूताई शिंदे, कृष्णात शिंदे, अजित कदम, सुरज शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

बामणीत २० पासून हरिनाम सप्ताह
सिद्धनेर्ली ः बामणी (ता. कागल) येथे बुधवार (ता. २०) ते बुधवार (ता. २७) एप्रिल या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सप्ताहाचे हे १२६ वे वर्ष आहे. बुधवारी (ता. २०) रोजी ह.भ.प. नवनाथ कुंभार यांच्या हस्ते विणा पूजनाने या सप्ताहास प्रारंभ होणार आहे. या सप्ताहात एकनाथ गुरव, अमृतानंद महाराज, तानाजी पाटील, नवनाथ कुंभार, हरिप्रसाद साठे, उदय कुमार पवार, उदयसिंह पाटील, उत्तम गुरव, शिवाजी पन्हाळकर, ओंकार कापूरकर, नामदेव वासकर, ज्ञानेश्वर महाराज, बाबुराव केसरकर यांचे कीर्तन व प्रवचन प्रवचनाचे कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय सकाळी श्री संत तुकाराम गाथा भजन, दुपारी हरिपाठ, सायंकाळी प्रवचन कीर्तन व संगीत हरिजागर असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

आकनूरमध्ये आज कीर्तन कार्यक्रम
सरवडे : आकनूर (ता. राधानगरी) येथील पार्वती महादेव पाटील यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त रविवारी रात्री कृष्णा महाराज कमानकर आळंदी झी टॉकीज फेम यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन तर शिवाजीराव वागवेकर, विजय लांबोरे, रोहित अंगज, संचालक एकनाथ पाटील, युवराज पाटील, एस. के. पाटील, अमोल दाभाडे, नामदेव रानमाळे, संभाजी शिंदे उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Tree Fall Incident : पुण्यातील विमाननगरमध्ये चालत्या गाडीवर कोसळलं गुलमोहराचं झाड; सुदैवाने जीवितहानी टळली, पण वाहतूक कोंडीचा नागरिकांना फटका

MS Dhoni चा चित्रपट पाहून तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतला...

IPL 2026: तीन बॅट, तिनदा रिजेक्ट अन् मग अंपायरलाच कळाली चूक; आयुष म्हात्रेच्या बॅटवरून मैदानात गोंधळ, नेमकं काय घडलं

Latest Marathi News Live Update : बनावट जात प्रमाणपत्रावर निवडणूक जिंकणाऱ्या माजी नगरसेवकावर २० वर्षांनी गुन्हा

नागपूरमध्ये ४५ बार बंद, परवाना शुल्कात वाढ झाल्याने मालकांवर आर्थिक ताण

SCROLL FOR NEXT