hawkers business Sakal
पुणे

पुणे : पथारी व्यावसायिकांचे १२ कोटी रुपयांचे शुल्क महापालिकेने केले माफ

कोरोना काळात लॉकडाउनमुळे पथारी व्यवसाय बंद असल्याने या काळातील १२ कोटी रुपयांचे शुल्क महापालिकेने माफ केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोरोना काळात लॉकडाउनमुळे पथारी व्यवसाय बंद असल्याने या काळातील १२ कोटी रुपयांचे शुल्क महापालिकेने माफ केले आहे.

पुणे - कोरोना (Corona) काळात लॉकडाउनमुळे (Lockdown) पथारी व्यवसाय (Hawkers Business) बंद असल्याने या काळातील १२ कोटी रुपयांचे शुल्क महापालिकेने (Municipal) माफ केले आहे. मात्र, मार्च २०२० पूर्वीचे व्यावसायिकांचे ६ कोटी रुपयांचे शुल्क थकीत आहे. हे शुल्क न भरल्यास पथारी व्यावसायिकांचे परवाने रद्द (License Cancel) केले जाणार आहेत. अतिक्रमण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर मार्च २०२० पासून संपूर्ण शहरात कडक लॉकडाउन लागला होता. त्यामुळे तेव्हापासून दीड वर्ष पथारी व्यवसाय सुरू झालेले नव्हते. त्याचा फटका हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांना बसलेला असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या काळातील पथारीचे शुल्क भरण्यासाठी नोटिसा बजावल्या. हे पैसे न भरल्याने दंडही लावण्यात आला. त्यामुळे पथारी व्यावसायिकांची कोट्यवधींची थकबाकी निर्माण झाली. हे शुल्क माफ करावेत, अशी मागणी पथारी संघटनांकडून करण्यात आली होती. पण तरीही प्रशासनाने दंड घेण्याची भूमिका कायम ठेवली.

या काळात सुमारे २१ हजार पथारी व्यावसायिकांची १९ कोटी रुपयांची थकबाकी होती. व्यावसायिकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२१ या कालावधीतील ८ कोटी ३२ लाखांचे शुल्क आणि ३ कोटी ६८ लाखाचा दंड माफ करण्याचा निर्णय स्थायी समितीने गेल्या महिन्यात घेतला. त्याचा फायदा शहरातील सर्व व्यावसायिकांना झाला. पण कोरोनाची लाट येण्यापूर्वी अनेक पथारी व्यावसायिकांनी शुल्क भरण्यास टाळाटाळ केल्याने थकबाकी ६ कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. ते पैसे वसूल करण्यासाठी अतिक्रमण विभागाने पुन्हा नोटिसा बजाविण्यात सुरवात केली आहे. व्यावसायिकांनी मुदतीत पैसे न भरल्यास त्यांच्या पथारीचा परवाना रद्द केला जाणार आहे.

पथारी व्यावसायिकांचे कोरोना काळातील शुल्क व थकबाकी माफ करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. पण त्यांच्याकडे यापूर्वीच्या काळातील थकबाकी आहे, ती वसूल करण्यासाठी नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. ही थकबाकी न भरल्यास परवाने रद्द केले जातील, तसेच गाळे सील केले जाणार आहेत.

- माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! पीक विम्यासाठी काय करावं? किती पैसे मिळणार? पाहा संपूर्ण गणित

Asian Games 2026: अरे आवाजsss कुणाचा... भारतीय पुरुष कबड्डी संघाने जिंकले नववे सुवर्णपदक; रोमहर्षक लढतीत इराणवर विजय

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT