पुणे

महादेव मंदिर परिसरातील विहिरीवर आकर्षक कारंजे

CD

वडगाव मावळ, ता. २१ : वडगाव नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा २.० या अभियानांतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने, येथील महादेव मंदिर परिसरातील विहिरीवर आकर्षक रंगीबेरंगी कारंजे बसविण्यात आले आहेत.
नगरपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानातील जल या तत्त्वानुसार पुरातन पाणीसाठ्याचे संवर्धन व सुशोभीकरण करण्यात येत आहे. शहरात पुरातन काळापासून मध्यवर्ती ठिकाणी महादेव मंदिरासमोरील विहीर प्रदूषित असल्याने व सध्या ती वापरातही नसल्याने, काही महिन्यापूर्वी या विहिरीची साफसफाई करून संरक्षक जाळी बसवण्यात आली होती. आता या विहिरीचे सुशोभीकरण करण्यात येत असून नुकतीच कीटकनाशक फवारणी, संरक्षक भिंतीवर रंगकाम तसेच विहिरीत आकर्षक कारंजे बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले.
लवकरच सभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. शहर स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झाले असून, शहरात मॉर्निंग तसेच नाईट वॉक करणाऱ्या नागरिकांसाठी हा परिसर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल अशी अपेक्षा नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी डॉ.जयश्री काटकर, उपनगराध्यक्षा शारदा ढोरे, आरोग्य समिती सभापती राहुल ढोरे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Corporation Protest: जंतर-मंतर आंदोलनाचे महापालिकेत पडसाद; सत्ताधारी-विरोधकांमध्ये घोषणाबाजी

Harmony Park: संगीताच्या सुरांमध्ये योगा आणि खेळ, ५० रुपयांच्या तिकिटात स्वप्नवत सफर! ३०० टन भंगारातून साकारल्या कलाकृती

Latest Marathi News Live Update : CJP चे सौरव दास आणि रांका चर्चेसाठी रवाना; थोड्याच वेळात सरकारसोबत बैठक, तोडगा निघणार?

सुबोध भावेने साकारली गोंदवलेकर महाराजांची भूमिका, अभिनेत्याबद्दल अनुभव सांगताना अर्थव सुदामे म्हणाला... 'त्यांनी पैसे...'

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

SCROLL FOR NEXT