पुणे

मराठीत पाट्या लावा शिवसेनेचा आग्रह

CD
मराठी पाट्यांसाठी शिवसेना आग्रही रसायनी, ता. २० (बातमीदार) : वासांबे मोहोपाडा बाजारपेठेतील दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात, यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायत सरपंच ताई पवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना शिवसेनेच्या शिष्टमंळाने बुधवारी निवेदन दिले. मराठीत दुकानांच्या पाट्या न लावण्यास शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. रसायनीचे मुख्यालय असलेल्या या बाजारपेठेतील अनेक दुकाने व इतर आस्थापनांवरील फलक इंग्रजी भाषेमध्ये दिसत आहेत. सदर फलक मराठी भाषेत असावेत, यासाठी ग्रामपंचायतीने दुकानदारांना सूचना द्यावी, असा आग्रह शिवसेनेकडून करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत या पाट्या मराठीत दिसल्या नाहीत तर शिवसेना व युवासेना आंदोलन छेडत इंग्रजी पाट्यांना काळे फासण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या वेळी वासांबे मोहोपाडा विभाग प्रमुख अजय सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे, माजी सरपंच रोशन राऊत, सदस्य स्वप्निल राऊत, ज्येष्ठ शिवसैनिक मारूती खाने आदि उपस्थित होते. रसायनी : दुकानाच्या पाट्या मराठीत लावण्याबाबत निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Delay Maharashtra : आधी 11, मग 15 अन् आता थेट...; महाराष्ट्रात 'या' तारखेला मान्सून सक्रिय होणार! हवामान खात्याचा नवा अंदाज, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस?

Sanchita Ugale: छावा चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं जीवन, नालासोपाऱ्यातील राहत्या घरात आढळला मृतदेह; DDLJ मध्येही काम केलं होतं

TMC कुणाची? बंडखोर पक्षाच्या नावासह चिन्हावर दावा करणार; शिवसेना, राष्ट्रवादीच्या वाटेवर ममतांचा पक्ष

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत अधिकाऱ्यासमोर शिवसैनिकांनी निमंत्रण पत्रिका फाडली

IND A vs SL A: दुष्काळात तेरावा महिना! विपराज निगमच्या चुकीचा फटका; भारताच्या धावा ICCने कमी केल्या, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT