पुणे

साहित्यिक कलावंत संमेलनात कार्यक्रमांची रेलचेल

CD

पुणे, ता. २२ ः साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे येत्या २५ व २६ डिसेंबर रोजी साहित्यिक कलावंत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव पुरस्काराने अनुक्रमे डॉ. रावसाहेब कसबे आणि दिलीप प्रभावळकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप बराटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

यंदा संमेलनाचे २१ वे वर्षे असून संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. कोथरूड परिसरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित या संमेलनाचे उद्घाटन २५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याच दिवशी दुपारी चार वाजता ‘जागतिक युद्धखोरी आणि भारताची दिशा’ या विषयावर ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात जतिन देसाई, संजय सोनवणी आणि डॉ. अमोल देवळेकर सहभागी होणार आहेत. तर २६ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांच्या हस्ते ‘वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव पुरस्कारा’चे वितरण होणार आहे, असे बराटे यांनी सांगितले. यावेळी साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे सचिव वि. दा. पिंगळे, खजिनदार संजय भामरे आणि उपाध्यक्ष राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: बिंदुसरेत आढळला चिमुरडीचा मृतदेह; बीड शहरामधील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

Gadchiroli News: पावसात धानाचे पुंजणे वाचवताना १७ वर्षीय मुलाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू; कोरची तालुक्यातील शेतातील दुर्घटना

Latest Marathi News Live Update : अमरावतीच्या बडनेरामध्ये 27 वर्षीय उच्चशिक्षित युवतीची संशयास्पद आत्महत्या

Vote Theft: निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करा; मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

औरंगाबाद नाही, आता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक; अधिकृत बदल, नवा कोडही जारी

SCROLL FOR NEXT