पुणे

पुणे शहरात पुन्हा निर्बंध लागू

CD

पुणे, २५ : ओमिक्रॉनचा धोका वाढत असल्याने राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेनेही शहरात कोरोना प्रतिबंधक नियमावली लागू केली आहे. शहरात रात्री ९ ते सकाळी ६ दरम्यान जमावबंदी लागू असणार आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज (ता. २५) यासंबंधीचे आदेश काढले. खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डालाही हे नियम लागू असणार आहेत. राज्यात ओमिक्रॉनचे रूग्ण वाढत असल्याने राज्य शासनाने शुक्रवारी (ता. २४) सुधारीत नियमावली लागू केली आहे. त्याचे आदेश महापालिकेला मिळाल्यानंतर हे आदेश काढले आहेत.
समारंभ, नाट्यगृह, खुल्या आणि बंदिस्त मैदानातील कार्यक्रमासाठी उपस्थितांची संख्या निश्‍चीत केली आहे. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहात १०० नागरिकांची मर्यादा असेल तर खुल्या मैदानात जास्तीत जास्त २५० जण किंवा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्केपेक्षा कमी उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमासाठीही उपस्थितीसाठी हेच बंधन असणार आहेत. हॉटेल, जीम, स्पाच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. आपत्ती निवारण कायद्यानुसार या नियमांचे पालन न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cybercrime: दिल्ली पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; पाच बँक कर्मचाऱ्यांसह सहा जणांना अटक

Ayush Mhatre: आयुष म्हात्रेच्या दुखापतीवर सर्जरी... IPL 2027 पूर्वी चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी वाढली! जाणून घ्या नेमकं काय झालं?

Marathi News Live Updates: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जयंत पाटील मैदानात

Ladki Bahin Yojana Restart : योजनेतून वगळलेल्या 'लाडक्या बहिणींना' न्याय मिळणार? बंद झालेला लाभ पूर्ववत करण्यासाठी डफळापुरात मोठे आंदोलन, महिला आक्रमक

सीनमध्ये नव्हतं तरीही त्याने तिचा हात धरला... स्मिता जयकर यांनी सांगितला सलमान- ऐश्वर्या यांचा किस्सा, म्हणाल्या,- ११ वाजले तरी...

SCROLL FOR NEXT