sakal
पुणे

घराबाहेरील नातेवाईकांविरोधातही घरगुती हिंसाचारांतर्गत तक्रार

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दीड वर्ष विद्यार्थ्यांची शाळा ऑनलाइनच भरली

CD

मुंबई, ता. ३ : एखाद्या विवाहित महिलेला तिच्या घरातील सदस्यांशिवाय घराबाहेरील अन्य नातेवाईकांकडून त्रास दिला जात असल्यास त्या नातेवाईकाविरोधातही घरगुती हिंसाचारांतर्गत तक्रार दाखल करता येऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहे. कौटुंबिक हिंसाचारासंबंधित महिला संरक्षण कायद्याची व्याप्ती ही केवळ पीडितेसोबत घरात राहणाऱ्यांपुरती मर्यादित नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

विवाहित तक्रारदार महिलेचा दीर तिचा छळ करतो असा आरोप एका महिलेने केला होता; मात्र तो त्यांच्याबरोबर राहत नाही, त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या कक्षेत तो येऊ शकत नाही, असा निकाल महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिला होता. याविरोधात महिलेने सत्र न्यायालयात अपील केले होते. न्या. यू. ए. पडवाड यांनी अपील मंजूर केले आहे. दीराविरोधात पुरेसे पुरावे असून कनिष्ठ न्यायालयाने कारवाई सुरू करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पीडित महिलेच्या पतीचे नातेवाईक जरी त्यांच्यासह राहत नसेल तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे न केल्यास त्या नातेवाईकांना हिंसाचार करण्याचा आपसूकच परवाना मिळेल आणि कायदा निष्प्रभ ठरू शकेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. दंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निर्णय सत्र न्यायालयाने रद्दबातल केला असून या कायद्याची व्याप्ती अधिक असल्याचे निरीक्षण व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Controversy: भारताच्या इतिहासात प्रथमच होणार ईव्हीएमची तपासणी, मुंबई हायकोर्टाची परवानगी! शिंदे गटाचा 'हा' आमदार अडचणीत?

inspirational Story: भंगाराच्या हातगाडीपासून सुवर्णपदकापर्यंत झेप; कष्टकरी पित्याच्या दीपक बेनकरची जिद्द, संगमनेरच्या मातीतून उगवलेला मल्लखांबपटू!

Ladki Bahin Scheme Fraud : KYC च्या नावाखाली महिलांच्या इभ्रतीवर घाला! 'लाडकी बहीण' योजनेच्या केवायसीसाठी चक्क शरीरसुखाची मागणी; दोन नराधमांवर गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : नागपूर मनपा बससेवेत गैरव्यवहार उघड, तीन ऑपरेटर्सवर कारवाई

Stock Market Today: शेअर बाजाराची उसळी! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; मात्र मोठ्या नफ्यानंतरही TCS चे शेअर्स घसरले

SCROLL FOR NEXT