पुणे

आता क्लिनअप मार्शल नाही तर उपद्रव शोधक पथक नेमणार

CD

‘क्लीनअप मार्शल’ना पालिकेचा नारळ!
स्वच्छ मुंबईची जबाबदारी आता ‘उपद्रव शोधक पथका’वर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : सर्वसामान्य नागरिकांच्या डोक्याला ताप ठरलेल्या क्लीनअप मार्शलला कायमची सुट्टी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबई स्वच्छ राखण्यासाठी आता क्लीनअप मार्शलऐवजी ‘उपद्रव शोधक पथका’ची नियुक्ती करणार आहे. त्यासाठी १५ संस्थांचे अर्ज आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबई महापालिकेने आपल्या २४ प्रशासकीय विभागांत क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली आहे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे आदी प्रकार थांबवून संबंधितांवर कारवाई करण्याची जबाबदारी क्लीनअप मार्शलवर होती. कोरोना काळात विनामास्क फिरणाऱ्यांवर क्लीनअप मार्शलच्या माध्यामातून दंडात्मक कारवाई केली जात होती. ३१ मार्चला त्यांच्या कंत्राटाचा कालावधी संपला असून त्यामुळे पालिकेने नवीन संस्थांना काम देण्याचा निर्णय घेतला आहे. क्लीनअप मार्शलऐवजी ‘उपद्रव शोधक पथक’ नियुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या असून त्याला १५ संस्थांनी प्रतिसाद दिला आहे.
क्लीनअप मार्शल अरेरावीने कारवाई करत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. अनेकदा सामान्य नागरिक आणि मार्शल यांच्यात खटके आणि वादावादीही होत होती. आता कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर क्लीपअप मार्शलचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२४ विभागांत नियुक्ती
पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांच्या अखत्यारित ‘उपद्रव शोधक पथका’ची नियुक्ती केली जाणार आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्या आणि कचरा टाकणाऱ्यांवर पथकाद्वारे कारवाई केली जाणार आहे. या पथकाला वेगळा गणवेशही दिला जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT