esakal
esakal
पुणे

आजपासून आयसीएसईच्या, तर मंगळवारपासून सीबीएसईची लेखी परीक्षा

CD

पाच कोटी दिल्यानंतरही अवैध सावकारी करणारे आणखी चार कोटी ७५ लाख रुपये मागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे - व्यवसायासाठी दिलेल्या तीन कोटी ५० लाख रुपयांच्या बदल्यात पाच कोटी १० लाख रुपये उकळण्यात आले. पाच कोटी दिल्यानंतरही अवैध सावकारी (Illegal Money Lender) करणारे आणखी चार कोटी ७५ लाख रुपये मागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातील दोन्ही आरोपींना (Accused) चतु:श्रृंगी पोलिसांनी सावकारी आणि खंडणीप्रकरणी (Ransom) कारवाई करून अटक (Arrested) केली आहे.

रामदास ऊर्फ नाना गोपीनाथ वाळके (वय ३७ रा. जय गणेशनगर, विधातेवस्ती, औंध) आणि अनिकेत रमेश हजारे (वय ३८, रा. ए/३२ हजारे सदन, सीएनजी पंपाशेजारी, दापोडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार ऑगस्ट २०१५ ते १० डिसेंबर २०२१ दरम्यान घडला आहे. बेकायदेशीररीत्या सावकारी पद्धतीने पैसे देऊन अवाजवी व्याज आकारणी करत खंडणीची मागणी केली, तसेच ती न दिल्यास सामाजिक बदनामी व मानसिक छळ करून तुझा गेम टाकायला कमी करणार नाही, अशी धमकी दिल्याप्रकरणी केल्याप्रकरणी पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांकडे स्वप्नील गणपत बालवडकर (रा. क्लोलिस रेसिडेन्सी, बालेवाडी) यांनी तक्रार केली होती. त्यानुसार वाळके आणि हजारे यांच्या विरोधात चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

फिर्यादींनी नाना वाळके याच्याकडून तीन कोटी ५० हजार रुपये घेतले होते. या रकमेच्या मोबदल्यात फिर्यादींनी हजारे याच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये बँकेद्वारे तीन कोटी दोन लाख २७ हजार रुपये व रोखीने दोन कोटी सात लाख ७३ हजार रुपये, असे एकूण पाच कोटी १० लाख रुपये परत केले आहेत. त्यानंतर आरोपी फिर्यादी यांच्याकडे अजून चार कोटी ७५ हजारांची मागणी करीत होते. हजारे याने फिर्यादीच्या नावावर असलेल्या वाहनांचे आरसी बुक, चेक घेतले. तसेच, त्यांच्याकडून बळजबरीने प्रॉमिसरी नोट लिहून घेतली. त्यानंतर वाळके याने फिर्यादी यांना ‘तू अनिकेत हजारे याला पैसे देऊन विषय संपव. नाहीतर तो इतर लोकांना एकत्र आणून तुझ्याविरुद्ध १० ते १५ खोट्या तक्रारी दाखल करीन, तुझा गेम टाकायला कमी करणार नाही. स्वत:चा व कुटुंबाचा विचार कर’, अशी धमकी दिली. या प्रकारानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. चतु:श्रृंगी पोलिसांनी खंडणी व सावकारी अधिनियमाखाली गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT