New year Celebration sakal
पुणे

नववर्षाचे स्वागत करताय; पण अशा आहेत सूचना

कोरोनाचा धोका वाढत आहे, त्यामुळे नववर्षाचे स्वागत करताना नागरिकांनी ३१ डिसेंबरला बाहेर न जाता शक्यतो घरीच साधेपणाने आनंद साजरा करावा.

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाचा धोका वाढत आहे, त्यामुळे नववर्षाचे स्वागत करताना नागरिकांनी ३१ डिसेंबरला बाहेर न जाता शक्यतो घरीच साधेपणाने आनंद साजरा करावा.

पुणे - कोरोनाचा धोका (Corona Danger) वाढत आहे, त्यामुळे नववर्षाचे स्वागत (New Year Celebration) करताना नागरिकांनी ३१ डिसेंबरला बाहेर न जाता शक्यतो घरीच साधेपणाने आनंद साजरा करावा. शहरात रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत जमावबंदी (Curfew) असणार आहे, असे महापालिका (Municipal) प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने नवे आदेश दिले आहेत, त्यानुसार महापालिकेने गुरुवारी (ता. ३०) आदेश काढले आहेत. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन हा वाढत असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ नये, यासाठी हे आदेश काढले आहेत.

अशा आहेत सूचना

- ३१ डिसेंबर व एक जानेवारी रोजी शक्यतो घराबाहेर पडू नये

- रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत जमावबंदीचे आदेश लागू

- नववर्षाचे स्वागत करताना बंदिस्त सभागृहात क्षमतेच्या ५० टक्के व खुल्या जागेत २५ टक्के उपस्थित हवी

- ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी घराबाहेर पडू नये

- आनंद साजरा करताना धार्मिक व सांस्कृतिक मिरवणुकांवर बंदी

- धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT