Hotel Sakal
पुणे

हॉटेल व्यावसायिक सज्ज, मात्र धाकधूक

पुणे शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आणि त्यामुळे हळूहळू लागू करण्यात येत असलेले निर्बंध, यामुळे हॉटेल व्यावसायिक पुन्हा धास्तावले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आणि त्यामुळे हळूहळू लागू करण्यात येत असलेले निर्बंध, यामुळे हॉटेल व्यावसायिक पुन्हा धास्तावले आहेत.

पुणे - शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या आणि त्यामुळे हळूहळू लागू करण्यात येत असलेले निर्बंध, (Restrictions) यामुळे हॉटेल व्यावसायिक (Hotel Owner) पुन्हा धास्तावले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे (New Year) स्वागत करण्यासाठी हॉटेलमध्ये होणारी गर्दी व त्यांना सेवा पुरविण्याची प्राथमिक तयारी अनेक हॉटेल व्यावसायिकांनी करून ठेवली आहे. पण, निर्बंधांबाबत काय होर्इल, अशी शंका त्यांच्या मनात आहे. थर्टीफर्स्टच्या निमित्ताने शहरातील हॉटेलांत मोठी गर्दी असते. त्यातून या व्यवसायिकांची मोठी आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो.

मात्र, कोरोनामुळे या दिवसाचे सेलिब्रेशन करण्यावर बंधने आली आहेत. त्याचा परिणाम व्यवसायावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत हॉटेल व्यावसायिक गोविंद नागरगोजे म्हणाले, ‘‘थर्टीफर्स्टच्या निमित्ताने आम्ही आमच्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या ऑफर देत असतो. त्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद वाढतो. मात्र, आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिसाद मिळेल की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांची तयारी केली आहे. परंतु, कोणतीही ऑफर दिली नाही. कारण, आम्ही केलेली गुंतवणूक वसूल झाली तरी ठिक आहे. मात्र, तोटा झाल्यास काय करणार असा प्रश्‍न पडला आहे.’’

‘कोरोनाची रुग्णसंख्या आणि निर्बंध लागू करण्याच्या तयारीमुळे व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही थोडीफार तयारी सुरू केली आहे. मात्र, अद्याप धास्ती कायम आहे. कोरोनापूर्वी आम्ही तीन ते चार दिवस आधीच सर्व तयारी करून ठेवायचो. पण, आता तशी स्थिती नाही.’

- कुणाल पलंगे, हॉटेल व्यावसायिक

ऑफर आणि पॅकेजला ब्रेक :

थर्टीफर्स्टला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल व रेस्टॉरंटकडून विविध ऑफर, फॅमिली व ग्रुपसाठी पॅकेज दिले जातात. मात्र, यावर्षी ऑफर आणि पॅकेज देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. नियमितपणे येणाऱ्या ग्राहकांवर व्यवसाय करू अशी मानसिकता हॉटेल चालकांची झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर कोसळली वीज, थरारक दृष्य कॅमेरात कैद; पाहा VIDEO

IND vs IRE 2nd T20I : शिवम दुबेच्या दोन चेंडूंनी सामना फिरवला, प्रिंस यादवने पदार्पणाचा सामना गाजवला; आयर्लंडला स्वस्तात रोखले

Aambegaon Heavy Rain: आंबेगाव तालुक्यात दमदार पाऊस; मंचरमध्ये ५१ मिमी पावसाची नोंद, शेतकऱ्यांना दिलासा तर वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT