पुणे, ता. ३० ः अनेक चढ-उतारांचा अनुभव पाठीशी असलेल्या सरत्या वर्षाला उत्साहात निरोप देण्यासाठी अवघं शहर सज्ज झालं आहे. हॉटेल व्यावसायिकांनी त्यासाठी जय्यत तयारी केली असली, तरी त्यावर निर्बंधांचे सावट आहेच. नागरिकांनी घरात बसून नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. त्यामुळे तरुणाईच्या उत्साहाला आवर घालण्यासाठी पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे.
कोरोनामुळे गेल्यावर्षी नववर्षाचे स्वागत थंडपणे झाले होते. यंदा मात्र, वातावरणात उत्साह आहे. त्यातच थंडीनेही पुणेकरांना मोहित केले आहे. शुक्रवारीही थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुलाबी थंडीत नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पुणेकरांचा उत्साह शिगेला पोचला आहे. काही पंचतारांकित हॉटेलमध्ये उपस्थितीच्या निर्बंधांचे पालन करून विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत, तर प्रशासन, पोलिस आणि हॉटेल व्यावसायिकांनी जय्यत तयारी केली आहे. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक मॉलमध्ये विद्युत रोषणाई करून आकर्षक सजावटही केली आहे. तसेच, अनेक हॉटेलमध्ये विशेष मेनूची यादीही तयार झाली आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना नव्या वर्षाचे स्वागत करताना केक कापण्याची प्रथा आता रूढ होत असल्यामुळे केकच्याही मागणीत वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानेही जय्यत तयारी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.