पुणे

सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थिती

CD

पुणे, ता. ३१ : ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असल्याने पुणे महापालिकेने शुक्रवारपासून (ता. ३१) शहरात नवे निर्बंध लागू केले. लग्न सोहळ्यांसह सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना ५० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहू शकणार नाहीत, असे आदेश महापालिका आयुक्तांनी शनिवारी काढले. तसेच, अंत्यविधीसाठी २० लोकांची मर्यादा घातली आहे. 

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्य सरकारच्या सूचनेनुसार पुण्यातील निर्बंध शिथिल केले. बंदीस्त सभागृहात, हॉलमध्ये क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीचे बंधन होते, तर खुल्या मैदानात क्षमतेच्या २५ टक्के नागरिकांना उपस्थितीचे परवानगी दिली होती. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून शहरांमध्ये पुन्हा एकदा सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली होती. मात्र, आता हे नियम बदलल्यामुळे कार्यक्रमाच्या उपस्थितीवर मर्यादा आल्या आहेत. महापालिकेने काढलेल्या आदेशात विवाह सोहळे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांसाठी केवळ ५० व्यक्ती उपस्थित राहू शकतील, तर अंत्यविधीसाठी २० नागरिक उपस्थित राहतील. या नियमांचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद केले आहे. 

पर्यटनस्थळांसाठी निर्बंध नाहीत
समुद्र किनारे किंवा इतर गर्दी होणाऱ्या पर्यटनस्थळांवर निर्बंध लावण्याचा अधिकार राज्य सरकारने स्थानिक प्राधिकरणास दिला आहे. पुणे महापालिकेच्या आदेशात शहरातील पर्यटनस्थळांवर निर्बंध लावण्यााबद्दल उल्लेख नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT