पुणे

बांधकाम शुल्कातून १०० कोटी पुणे महापालिकेच्या उत्पन्नात ‘युनिफाईड डीसी रूल्स’मुळे भर

CD

पुणे, ता. १ : राज्य सरकारने एकात्मिक बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीमध्ये (युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स) बांधकाम व्यावसायिकांना विकसन शुल्क भरण्यासाठी पाच हप्त्यांची सुविधा दिली. त्यामुळे गेल्या सुमारे १० महिन्यांत शहरातील बांधकाम व्यावसायिकांचे ५०० कोटी रुपयांच्या बांधकाम शुल्काचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्याबदल्यात महापालिकेला पहिल्या हप्त्यातून १०० कोटी रुपये मिळाले आहेत.

राज्यात प्रत्येक महापालिका स्वतःची बांधकाम नियमावली तयार करून, राज्य सरकारच्या मान्यतेने त्यांची अंमलबजावणी करत होती. परंतु, प्रत्येक शहरात भिन्न नियम असल्याने बांधकामाच्या नियमावलीत सुलभता येण्यासाठी सरकारने ‘युनिफाईड डीसी रूल्स’ची अंमलबजावणी २०२१ मध्ये सुरू केली.

बांधकाम प्रकल्पांची मान्यता घेताना तेथील रेडिरेकनरच्या दरानुसार व्यावसायिकांना महापालिकेकडे त्याचे शुल्क भरावे लागते. मोठ्या बांधकाम प्रकल्पांचे शुल्क हे साधारपणे
कोट्यावधीच्या घरात असते. साधारपणे सध्याच्या रेडिरकेनरच्या दरानुसार १ लाख चौरस फुटापेक्षा जास्त बांधकामाचे ५० लाखापेक्षा जास्त बांधकाम शुल्क होते.
बांधकाम प्रकल्प सुरू करताना त्यासाठी बँकांकडून कर्ज घेणे, त्याचे व्याज देणे यासह इतर दायित्व बांधकाम व्यावसायिकांवर निर्माण होते. त्यामुळे बांधकाम शुल्क भरण्यासाठी हप्त्यांची सवलत द्यावी, अशी मागणी बांधकाम क्षेत्रातून होत होती. त्यानुसार शासनाने युनिफाईड नियमामध्ये ही सवलत दिली. ५० लाखापेक्षा जास्त बांधकाम शुल्क असणाऱ्या प्रकल्पांना पाच हप्त्यांमध्ये शुल्क भरण्याची मुभा देण्यात आली आहे. मोठे प्रकल्प हाती घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना याचा फायदा झाला आहे.

राज्य सरकारच्या युनिफाईड नियमावलीत ५० लाखापेक्षा जास्त बांधकाम शुल्क असणाऱ्या प्रकल्पांना पाच हप्‍त्यांमध्ये पैसे भरण्याची सुविधा दिली आहे. त्यावर दरवर्षी ८ टक्के व्याज घेतले जाते. महापालिकेने आतापर्यंत ५० लाखापेक्षा जास्त शुल्क असणारे सुमारे ५०० कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्यातून पहिल्या हप्त्‍याचे १०० कोटी रुपये महापालिकेला मिळाले आहेत. उर्वरित रक्कम पुढील पाच वर्षात जमा होईल.
-युवराज देशमुख, अधिक्षक अभियंत, बांधकाम विभाग, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: शस्त्रसंधी झाली पण होर्मुझ बंदच! पुन्हा युद्ध सुरु होण्याचा धोका; विशेष परवानगी घेण्याचे जहाजांना मेसेज, नाहीतर...

Mulshi Bhalgudi fire: मुळशी तालुक्यातील भालगुडी लव्हाळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; सुदैवाने जीवितहानी टळली

Pune suspected rabies dog bite: म्हात्रे पूल परिसरात संशयित रेबिजग्रस्त श्वानाचा पाच जणांना चावा; महापालिकेच्या तत्परतेने अनर्थ टळला

Pune Municipal Corporation News: नगरसेवकांना खासगी सोसायट्यांमध्ये ‘स’ यादीतून कामे करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव; पुणे शहर सुधारणा समितीसमोर मागणी

Pune Overhead Cable Policy: ओव्हरहेड केबल गोंधळावर तोडगा; पुणे महापालिकेकडून भूमिगत केबलला प्राधान्य देत नवे धोरण, समिती स्थापन

SCROLL FOR NEXT