Koregaon will develop Bhima Shourya Smarak as appropriate Energy Department Nitin Raut
Koregaon will develop Bhima Shourya Smarak as appropriate Energy Department Nitin Raut  sakal
पुणे

कोरेगाव भीमा शौर्य स्मारकाला साजेसा विकास करणार : राऊत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ (vijay stambh)ऐतिहासिक असून, पर्यटनस्थळ म्हणून नव्हे तर शूरवीरांना अभिवादन करण्याचे स्थळ म्हणून विकसित करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिले.
डॉ. राऊत यांनी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करून पुष्पचक्र अर्पण केले. वढू (बु.) तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज(Chhatrapati Sambhaji Maharaj)यांचे समाधीस्थळ आणि वीर गोविंद गोपाळ गायकवाड महाराज यांच्या समाधीस्थळांना भेटून त्यांनी अभिवादन केले. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. (vijay stambh koregaon bhima)

‘‘राज्य सरकारने या स्मारक परिसराचा विकास करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून आवश्यक त्या सोयीसुविधा लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हा स्तंभ शौर्याचे प्रतीक आहे. दीक्षाभूमी, चैत्यभूमीसारखाच कोरेगाव भीमा स्मारकाचा विकास करण्यात येईल,’’ अशी ग्वाही त्यांनी दिली. काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोठिया, राज्य मानवाधिकार आयोगाचे माजी अध्यक्ष न्या. सी. एल. थूल, ‘महावितरण’चे उत्तम झाल्टे, प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष गौतम आरकडे, उपाध्यक्ष सुजित यादव, शहराध्यक्ष शिलार रतनगिरी आदी या वेळी उपस्थित होते.

विद्युत वाहिन्या भूमिगत होणार
वढू (बु.) तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज आणि वीर गोविंद गोपाळ गायकवाड महाराज यांच्या समाधीस्थळ परिसरातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे आदेश डॉ. राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. यापूर्वी त्यांनी कोरेगाव भीमा परिसर आणि वढू बुद्रूक येथील समाधी परिसरात हायमास्ट दिवे तत्काळ उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वढू गावात नियमित वीज पुरवठा खंडित झाल्यास रिंगफिडर या पर्यायी व्यवस्थेद्वारे आपत्कालीन वीज पुरवठ्याची व्यवस्था उभारण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT