पुणे

रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून ५ कोटी ९५ लाखांचा दंड केला वसूल

CD

पुणे, ता. १ : पुणे रेल्वे विभागाने या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत एक लाख ३४ हजार विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर करवाई केली. या कारवाईतून रेल्वेने ५ कोटी ९५ लाखांचा दंड केला वसूल केला आहे.

रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी सातत्याने केली जात आहे. या विना तिकीट प्रवास करताना आढळून येताच त्या प्रवाशांवर कारवाई केली जात आहे. डिसेंबर महिन्यात तिकीट तपासणी दरम्यान २७ जणांनी विनातिकीट प्रवास केल्याबद्दल ११ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर १४८ प्रवाशांनी आरक्षण न करता साहित्याची अथवा वस्तूंची ने आण केल्याने त्यांच्याकडून २२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रकाश उपाध्याय, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, श्याम कुलकर्णी, एस.. व्ही.एन. सुभाष यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने तिकीट तपासणी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त आरक्षित तिकीट असेल तरच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. अन्यथा रेल्वे कायद्यांनुसार प्रवाशांना दंड भरावा लागेल. जर दंड न भरला नाही त्याला तुरुंगवासही होऊ शकतो, असे रेल्वे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray CJP protest : आदित्य ठाकरे निवडणूक आयुक्तांना थेट गद्दार म्हणाले, ‘गद्दार ज्ञानेश गेलेच पाहिजेत’; CJPच्या आंदोलनाला पाठिंबा

Pune News : पुणे महापालिकेचा कारभार 'रामभरोसे'; प्रमुख अधिकारी, पदाधिकारी परदेशात

Cockpit attack: 'मोठी किंमत मोजावी लागेल', कॉकपिट घटनेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इशारा

Alandi News : 36 विद्यार्थी सुखरूप आळंदीत परतले; पोलीस ठाण्यात पालकांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

SCROLL FOR NEXT