पुणे

वर्षाच्या पहिल्याच दिवशी ३१५ कोरोनोमुक्त

CD

पुणे, ता. १ : जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी (ता.१) ६३१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसातील एकूण रुग्णांत पुण्यातील ३९९ जण आहेत. याउलट दिवसात ३१५ जण कोरोनोमुक्त झाले आहेत.
कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १२७ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ११०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५७, नगरपालिका हद्दीतील १५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील सहा जण आहेत. तर दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील मृत्यूमध्ये शहर आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक मृत्यू आहे.
चार दिवसांपासून सातत्याने दिवसातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने खूप कमी आहे. जिल्ह्यातील दिवसांतील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये शहरातील ३९९ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ११२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ८४, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी १८ रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येने शनिवारी (ता.१) तीन हजारांचा आकडा ओलांडला आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ३ हजार २७४ झाली आहे. एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ६१२ जणांवर उपचार सुरु आहेत. उर्वरित २ हजार ६६२ जण हे गृह विलगीकरणात आहेत.
सद्यःस्थितीत पुणे शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येने दोन हजारांचा आकडा पार केला आहे. शहरात सध्या २ हजार ७० सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी ३०६ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित १ हजार ७६४ जण गृह विलगीकरणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget Impact on Bangladesh: मोदी सरकारने अर्थसंकल्पातून बांगलादेशच्या युनूस सरकारला दिला जबरदस्त दणका!

Latest Marathi News Union Budget 2026: अर्थसंकल्पात फक्त मोठे आकडे आणि पोकळ आश्वासने प्रत्यक्षात जनतेच्या हाती तूरी - हर्षवर्धन सपकाळ

Union budget 2026-27: अर्थसंकल्पात केंद्राचं लाडकं राज्य कोणतं? अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचा संकल्प

Australia Open 2026: अल्काराजचेच वर्चस्व! जोकोविचविरुद्ध दणक्यात पुनरागमन करत पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

Union Budget 2026: 'या' लोकांसाठी अर्थसंकल्प ठरला अपूर्ण आशांची कहाणी; अपेक्षा काय होत्या, काय मिळाले? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT