पुणे

एनडीए प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

CD

पुणे, ता. २ ः केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४९ व्या आणि नेव्हल अकॅडमीच्या (एनए) १११ व्या तुकडीच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया बारावीमध्ये असलेल्या व बारावी उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींसाठी असून, इच्छुक उमेदवारांना ११ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.
गेल्या वर्षीपासून मुलींनादेखील एनडीएमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळाली. यंदाचा एनडीए आणि नेव्हल अकॅडमी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ४०० जागा असून, यामध्येही मुलींसाठी एकूण १९ राखीव जागा ठेवल्या आहेत. यामध्ये सैन्यदलासाठी १०, हवाईदलासाठी सहा आणि नौदलासाठी तीन या पद्धतीने मुलींची निवड केली जाणार आहे, तर नेव्हल अकॅडमीची प्रवेश प्रक्रिया केवळ मुलांसाठी आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी वयोमर्यादा ठेवली आहे. ही लेखी परीक्षा १० एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे. यासाठी पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबादसह देशातील ७० हून अधिक केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना ११ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. या प्रवेश प्रक्रियेशी संबंधित अधिक माहिती व ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी upsconline.nic.in या यूपीससीच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update : अजित पवारांचा १ लाख १ हजार मतांच्या विजयाचा विक्रम पार, सुनेत्रा पवारांना किती मतं मिळाली?

Who is Suryansh Shedge? लेकाच्या स्वप्नासाठी आईने नोकरी सोडली... पण मुलाने मैदान गाजवलं! कोण आहे पंजाब किंग्सचा नवा 'मुंबईकर' फिनिशर?

Ambedkar nagar Encounter: पहाटे 5 वाजता एन्काउंटर! आईसह ४ मुलांची हत्या करणाऱ्या आमिरला पोलिसांनी उडवले, बुलेटप्रूफ जॅकेटमुळे वाचला अधिकारी

IPL 2026: जसप्रीत बुमराहला मुंबई इंडियन्सकडून विश्रांती मिळणार? हेड कोचने दिलं धक्कादायक उत्तर

Ro-Ro Service: कोकण प्रवास महागणार! रो-रो सेवेच्या तिकीट दरात वाढ होणार; सर्वसामान्यांना मोठा फटका,नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT