पुणे

पुणे-मुंबई प्रवाशांसाठी सीझन पास सुविधा द्यावी

CD

पुणे, ता. २ ः पुण्यातून मुंबईला दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे रेल्वेला उत्पन्न देखील मोठ्या प्रमाणात मिळते. तरी सुद्धा कोरोनानंतर रेल्वे सेवा पुर्ववत होऊन ही नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने सीझन पास सुविधा सुरू केली नाही. तर दुसरीकडे मुंबई-नाशिक या मार्गावरील प्रवाशांसाठी सीझन पास सुविधा दिली आहे. मात्र, पुणे-मुंबई प्रवाशांसाठी ही सुविधा दिली नाही. तरी ही सुविधा द्यावी, अशी रेल्वे प्रवासी ग्रुपने केला आहे.
रेल्वे प्रवासी ग्रुपचे अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, ‘‘राज्यात सरकारने रेल्वे प्रशासनाला सीझन पास देण्याचे लेखी आदेश दिले आहेत. परंतु, या आदेशाला मध्य रेल्वेने केराची टोपली दाखवली आहे.’’

‘‘कोणत्या गाड्या सुरू कराव्यात, सीझन पास सुरू करणे, जनरल डबे सुरू करणे, आदी बाबतचे निर्णय मध्य रेल्वेच्या मुख्यालयातून घेतला जातात. ज्यावेळी याची अंमलबजावणी करण्यास सांगितले जाईल, त्यावेळी निर्णय घेतला जाईल.’’
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग.

या आहेत, प्रवाशांच्या मागण्या
- लॉकडाऊनकाळात बंद केलेल्या सर्व रेल्वे गाड्या सुरू कराव्यात.
- नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी राखीव जागा ठेवावी.
- जनरल डबे सुरू करावेत.
- प्रगती एक्स्प्रेस, सोलापूर इंटरसिटी सुरू करावी.
- लॉकडाऊन (२५ मार्च) पूर्वी काढलेले पास नियमित करावा.
- मध्य रेल्वेने पुणेकरांशी दुजाभाव करू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT