sakal
sakal
पुणे

महिलेचे ६० हजारांचे दागिने लंपास

CD

बेरोजगारी व कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या मुलाने आपल्या वयोवृद्ध आईला औषधाचा जादा डोस देऊन खून केला.

पुणे - बेरोजगारी व कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या मुलाने आपल्या वयोवृद्ध आईला (Mother) औषधाचा जादा डोस (Overdose) देऊन खून (Murder) केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही धक्कादायक घटना धनकवडी परिसरात शनिवारी पहाटेच्या घडली. गणेश मनोहर फरताडे (वय ४२, रा. अक्षय गार्डन सोसायटी, धनकवडी) असे गळफास घेणाऱ्याचे नाव आहे. तर निर्मला मनोहर फरताडे (वय ७६) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. नववर्षाच्या सुरुवातील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी गणेशचा मावसभाऊ शोनीत तानाजी सावंत (वय ३६, थोरात कॉलनी,एरंडवणे) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक (गुन्हे) युनूस मुलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हे त्यांच्या आईसमवेत धनकवडीतील अक्षय गार्डन सोसायटीमध्ये राहात होते. तो अभियंता होता. मार्च महिन्यामध्ये नोकरी गेल्यापासून तो बेरोजगार होता. आईला गुडघेदुखीचा त्रास असल्याने तिच्यावरही उपचार सुरू होते. त्यासाठी त्याला पैशांची गरज भासत असल्याने त्याने अनेकांकडून पैसे घेतले होते. बेरोजगारी, आईचे आजारपण व लोकांचे पैसे परत देण्यासाठी सातत्याने होणाऱ्या मागणीला कंटाळून त्याने शुक्रवारी मध्यरात्री आईला औषधांचा जादा डोस दिला.

त्यानंतर पहाटेच्या सुमारास तिच्या आईच्या तोंडाभोवती प्लास्टिकची पिशवी गुंडाळली, तसेच दोरीच्या साहाय्याने आईचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती सहकारनगर पोलिसांना शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर सहायक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वाती देसाई यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, गणेश यांनी बेरोजगार झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास सुरुवात केली होती. त्यासाठीही त्यांनी अनेकांकडून पैसे घेतले होते. मात्र, त्यातही त्यांना फायदा होण्याऐवजी नुकसान झाले होते.

मावसभावाला मेसेज पाठवून संपविले जीवन

'आपण आईचा खून केला असून, आता आपणही आत्महत्या करणार आहे,' असा मेसेज गणेशने त्यांच्या मावसभाव शोनीतला शनिवारी पहाटे दोन वाजता पाठविला. त्यानंतर शोनीतने त्याच्याशी खूप वेळ संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत सहकारनगर पोलिसांना खबर दिली. पोलिस पहाटे पाच वाजता त्यांच्या घरी पोचले. तोपर्यंत गणेशनेही गळफास घेऊन जीवन संपविले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT