पुणे

पोलिसाकडूनच पोलिसाला मारण्याची सुपारी

CD

पुणे, ता. २ : शेजारी राहात असताना झालेल्या किरकोळ वादातून एका पोलिसाने दुसऱ्या पोलिसाला जीवे मारण्याची सुपारी एका सराईत गुन्हेगाराला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यामध्ये फरासखाना पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यासह सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल केला. यातील सराईतास पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला ५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस कर्मचारी नितीन दुधाळ, योगेश प्रल्हाद अडसूळ (वय ३५, रा. एकता कॉलनी, हडपसर), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अडसूळ याला पोलिसांनी अटक केली आहे.
दुधाळ हा फरासखाना पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे. तर अडसूळ हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनासह विविध प्रकारचे सहा गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. कोरोना संसर्ग वाढल्याच्या काळात अडसूळ हा ‘पॅरोल’वर कारागृहाबाहेर आला होता. दुधाळ व दत्तवाडी पोलिस ठाण्यात नेमणुकीला असलेले दिनेश दोरगे हे एकमेकांच्या शेजारी राहात होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. या रागातून दुधाळ याने अडसूळ याला दोरगे यांना मारण्याची सुपारी दिली. दुधाळ व अडसूळ हे दोघेही हडपसर परिसरात भेटले होते. त्यावेळी या कामासाठी दुधाळने अडसूळला दहा हजार रुपये दिले होते. दुचाकी चोरुन त्या दुचाकीने दोरगेचा अपघात करून त्यास कायमस्वरुपी अपंगत्व आण, तसेच जीव गेला तरी आपण बघून घेऊ, असे दुधाळने अडसूळला सांगितले होते. त्यानुसार, अडसूळ याने दोरगे यांच्यावर पाळत ठेवली होती. तसेच त्यांची सर्व माहिती काढण्याचे काम अडसूळ याने दत्तवाडी परिसरातील एका व्यक्तीला दिले होते. त्यानुसार संबंधित व्यक्तीकडून दोरगेंच्या हालचालींवर नजर ठेवली जात होती. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अडसुळला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दुधाळ याने सुपारी दिल्याची कबुली केले. दरम्यान, दुधाळ हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT