पुणे

विनाअनुदानित तत्त्वावर व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्याची मान्यता व्यवसाय अभ्यासक्रमास मान्यता

CD

पुणे, ता. ३ : द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यमान तसेच नवीन संस्थेत नवीन आणि अधिकच्या तुकड्यांना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्त्वावर व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. राज्य सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने ही मान्यता दिली आहे.

पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम आणि द्वितीय स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था आणि अधिकच्या तुकड्यांना कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने दिलेल्या मुदतीत ज्या संस्थांनी सरकारच्या वेबपोर्टलवर मान्यतेसाठी अर्ज केले होते. तसेच व्यवसायास आवश्यक सर्व सुविधा पूर्ण करून निरीक्षणाकरिता विनंती केली होती. अशा संस्थांचा निरीक्षण कार्यक्रम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी (आयटीआय) नेमलेल्या समित्यांमार्फत पूर्ण करण्यात आला. या निरीक्षण समित्यांनी त्याचे अहवाल संबंधित वेबपोर्टलवर अपलोड केले आहेत.

शैक्षणिक संस्थांकडून मिळालेल्या दस्तऐवजांची छाननी करून त्यानुसार आवश्यक मानकांची पूर्तता करणाऱ्या संस्थांना द्वितीय स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. मान्य अभ्यासक्रमांच्या नवीन किंवा अधिकच्या तुकड्या सुरू करण्यास कायमस्वरूपी विनाअनुदान तत्त्वावर मान्यता दिली असली तरीही, भविष्यात कोणत्याही प्रकारचे अनुदान अथवा आर्थिक मदत देण्यात येणार नाही. सरकारने वेळोवेळी निश्चित केलेले शिक्षणशुल्क विद्यार्थ्यांकडून आकारणे संबंधित शिक्षण संस्थेस बंधनकारक राहणार आहे. तसेच, भविष्यात संबंधित अभ्यासक्रम बंद करण्याबाबत किंवा त्यात बदल करण्याविषयी सरकारने धोरणात्मक निर्णय घेतल्यास तो विनाअट संस्थेने अमलात आणणे आवश्यक राहणार आहे. अभ्यासक्रमांना मंजुरी मिळाल्यानंतर हे अभ्यासक्रम सुरू केल्याची माहिती संस्थेने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास तत्काळ द्यावी, अशा सूचना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी अध्यादेशाद्वारे केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणारं २० वर्षे जुनं प्रकरण काय? PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT