पुणे

शहरात आजपासून मुलांचे लसीकरण

CD

पुणे, ता. २ : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा लहान मुलांसाठीच्या टप्प्याला उद्यापासून (ता.३) सुरुवात होणार आहे. त्यानुसार १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात एक या प्रमाणे चाळीस ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या सर्व ठिकाणी कोव्हॅक्सिनची लस दिली जाणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयात सकाळी दहा वाजता या लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे.

नाताळच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांचे लसीकरण मोहीम सुरू करण्याविषयी जाहीर केले होते. त्यानुसार महापालिकेकडून उद्यापासून केली जाणार आहे. त्यासाठी या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नाव नोंदणी शनिवारपासूनच सुरू झाली होती. ५० टक्के ऑनलाइन आणि ५० टक्के ऑफलाइन असे नियोजन केले आहे. त्यामुळे ५० टक्के मुलांना "ऑन दि स्पॉट'' येऊन नोंदणी करता येणार आहे. २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले या लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. केंद्र सरकारच्या कोविन पोर्टल किंवा ॲप्लिकेशनवर नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय लसीकरणाच्या प्रत्येक दिवशी सकाळी आठ वाजता नोंदणीसाठी स्लॉट ओपन केला जाणार आहे. लसीकरणाला येताना लाभार्थ्याकडे आधारकार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अत्यावश्‍यक आहे.

१० हजार मुलांना डोस देण्याचे नियोजन
शहरातील ४० केंद्रांवर हे लसीकरण होणार असून, प्रत्येक केंद्रावर २५० लशीचे नियोजन केले आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी दोन किंवा तीन स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी सुमारे १० हजार मुलांना डोस देता येईल असे हे नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT