पुणे

भारतीय उद्योजकांनी गुंतवणूक करावी मोरोक्को, कॉस्टरिका, नायजेरियातील राजदुतांचे चर्चासत्र आवाहन;‘बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड’चे वितरण

CD

पुणे, ता. २ : ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे (जीआयबीएफ) आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात मोरोक्को, कॉस्टरिका, अझरबैजान आणि नायजेरियाच्या राजदूतांनी भारतीय उद्योजकांना त्यांच्या देशात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. या देशांमध्ये उद्योग विस्ताराच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

विदेशी उद्योजकांसाठी पायाभूत सुविधा, नियम, उद्योगाच्या संधीविषयी मोरोक्कोचे राजदूत मोहम्मद मलिकी, कॉस्टरीकाचे राजदूत क्लॉडीओ अनसोरेना, अझरबैजानचे राजदूत डॉ. मोहम्मद मालिकी, नायजेरियाचे उच्चायुक्त अहमद सुले यांच्यावतीने ख्रिस्तोफर केके यांनी माहिती दिली. हिंजवडी येथील हॉटेल रमाडा प्लाझा येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे होत्या. ‘जीआयबीएफ’चे अध्यक्ष जितेंद्र जोशी, समन्वयिका दीपाली गडकरी आदी उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे व राजदुतांच्या हस्ते उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. उद्योगावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात चारही देशांच्या राजदूतांनी त्यांच्या देशातील उद्योगांच्या संधींविषयी माहिती दिली. ‘बिझनेस टायकून’ या मासिकाचे या वेळी प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन नीलकमल आंचन यांनी केले. दीपाली गडकरी यांनी आभार मानले.

चार कौन्सिलची स्थापना
इंडिया-मोरोक्को बिझनेस ॲण्ड कल्चरल कौन्सिल, इंडिया-कॉस्टरिका बिझनेस ॲण्ड कल्चरल कौन्सिल, इंडिया-अझरबैजान बिझनेस ॲण्ड कल्चरल कौन्सिल, इंडिया-नायजेरिया बिझनेस ॲण्ड कल्चरल कौन्सिल या चार कौन्सिलची स्थापना करण्यात आली. व्यावसायिक, उद्योजक, चेंबर्स, विविध देशांचे दूतावास यांना एका व्यासपीठावर आणुन उद्योग क्षेत्राची प्रगती करण्याचा ‘जीआयबीएफ’चा उद्देश असल्याचे डॉ. जितेंद्र जोशी यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT